आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भारतीय थाळी सर्वोत्कृष्ट, पृथ्वीचेही आरोग्य जपणारी, 16 देशांच्या 37 संशोधकांचा अहवाल

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

ज्वारी, बाजरी, मका इत्यादी कडधान्याचा समावेश असलेली भारतीय पारंपरिक थाळी आरोग्यदायी आहेच, शिवाय पर्यावरणाच्या दृष्टीनेदेखील सर्वोत्कृष्ट ठरली आहे. जगभरातील १६ देशांच्या ३७ संशोधकांनी ३ वर्षांच्या अभ्यासानंतर भारतीय पारंपरिक थाळीचा या निष्कर्षाद्वारे जणू गौरवच केला आहे. ‘फूड प्लॅनेट हेल्थ’ संशोधनात भोजनात ५० टक्के वाटा हा मोसमी फळ-भाज्यांचा असला पाहिजे, ही गोष्ट आम्हाला लक्षात आली. त्याचबरोबर ज्वारी, मका, बाजरीसारख्या कडधान्याचाही वापर आहारात असला पाहिजे. २३२ ग्रॅम कडधान्यात सर्वाधिक ८११ कॅलरी असते. उच्च कॅलरी असलेली कडधान्ये दुर्दैवाने आता आपल्या थाळीतून बाद झाली आहेत. 


वास्तविक अशा धान्याची शेतीही पर्यावरणासाठी पोषक ठरते. गेल्या पन्नास वर्षांत भारतात कडधान्याचा भोजनातील वापर ६० टक्के कमी झाला आहे. त्याची जागा तांदूळ व गव्हाने घेतली आहे. तांदूळ व गहू ग्रीन हाऊस उत्सर्जन करतात. पाणीयुक्त या धान्याच्या शेतांतून मिथेन गॅस निघतो. अशी शेती करण्यासाठी सातत्याने पंपाचा वापर करावा लागतो. १९९० ते २०१६ दरम्यान देशात झालेल्या एकूण उत्सर्जनापैकी १६.७ टक्के वाटा शेतीचा होता. जागतिक पातळीपेक्षा ते ५० टक्के कमी आहे. भात शेतीसाठी इतर कडधान्याच्या तुलनेत ५० टक्के जास्त पाण्याची गरज असते. त्यामुळेच आरोग्य व पर्यावरणाच्या विचार करून संशोधकांनी ‘प्लॅनेटरी हेल्थ डाएट’ची आहारयोजना तयार केली आहे. 


जगभरात पर्यावरण व आरोग्यासाठी तीन सर्वात मोठे धोके, संशोधकांचा इशारा 
जैवविविधतेसाठी वाढती शेती धोका 

शेतीमध्ये ७० टक्के पाण्याचा वापर होतो. आपण पाणी जमीन, तलाव, नदीतून घेतो. शेती वाढवण्यासाठी जंगलतोड केली जात आहे. त्यामुळे जैवविविधता नष्ट होण्याचा धोका निर्माण झाला आहे. 


मधुमेह, स्थूलपणा, हृदयविकाराची भीती  
भारतात भोजनाची पद्धत बिघडू लागली आहे. त्यामुळे तीन दशकांपासून मधुमेह, स्थूलता, हृदयविकाराच्या रुग्णांमध्ये वेगाने वाढ झाली. १९९० पासून भारतात २८ टक्के मृत्यू याच आजारांमुळे होत आहेत. 


चुकीचा डाएट, १.१६ कोटी लोकांना धोका
भोजनात मांस-डेअरी पदार्थांचा जास्त वापर सर्रास वाढला आहे. खानपानाच्या चुकीच्या सवयींमुळे जगभरात १.१६ कोटी लोकांचा मृत्यू अचानक होण्याचा धोका वाढला. योग्य डाएटने २५ टक्के मृत्यू टळेल.


उपाय : मोसमी फळे-भाज्यांतून आरोग्य सुधारता येते 
या अहवालानुसार वनस्पतीजन्य आहाराचा सर्वाधिक वापर व प्राणीजन्य आहार कमी करायला हवा. भोजनात स्थानिक पातळीवरील मोसमी फळे, भाज्यांचे प्रमाण ५० टक्क्यांवर असावे. उर्वरित निम्मा भाग हा कडधान्य, शेंगा, ड्रायफ्रूट्स, तेल, मांसाहार इत्यादी असावा. अशा भोजनाचा वापर केल्यास ग्रीन हाऊस उत्सर्जनामध्ये ५० टक्के घट केली जाऊ शकते.
इनपुट : स्टेसी ब्लोंडिन, हार्वर्ड युनिव्हर्सिटी. 

बातम्या आणखी आहेत...