आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पर्यावरणवादी कार्यकर्त्या आणि मुक्त लेखिका सुलभा चक्रवर्ती यांचे अपघाती निधन

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नागपूर- पर्यावरणवादी कार्यकर्त्या आणि मुक्त लेखिका सुलभा चक्रवर्ती यांचे रविवारी सकाळी अपघाती निधन झाले. अपघात झाला त्यावेळी त्या स्वत:च कार चालवित होत्या. कारमध्ये त्या एकट्याच होत्या. 


पचमढी येथून नागपुरकडे येत असताना पहाटे त्यांचे कारवरील नियंत्रण सुटल्याने कार रस्त्यालगतच्या तळ्यात जाऊन थांबली. त्यातच त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या मागे पती व दोन मुले असा आप्त परिवार आहे. १५ आॅगस्टला त्यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला होता. कीडस् फाॅर टायगर या स्वयंसेवी संस्थेच्या त्या मानद अध्यक्ष होत्या. शालेय मुलांमध्ये वन्यजीवांप्रति जागरूकता करण्याची मोहीम त्यांनी हाती घेतली होती. 

बातम्या आणखी आहेत...