आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पर्यावरण पुढाकाराबद्दल कोराडी वीज केंद्राची ग्रीन पेटल-२०१८ पुरस्कारासाठी निवड

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

भुसावळ- महानिर्मितीच्या ३ x ६६० मेगावाट क्षमतेच्या कोराडी औष्णिक विद्युत केंद्राची पर्यावरणीय पुढाकारासाठी ग्रीन पेटल-२०१८ या पुरस्कारासाठी ग्रीन मॅपल फाउंडेशनने निवड केली आहे.

 

पर्यावरण संवर्धन विषयक उल्लेखनीय कार्य करणाऱ्या संस्थांचा सन्मान करण्याचे काम ग्रीन मॅपल फाउंडेशन करीत असते. २ डिसेंबर २०१८ रोजी या पुरस्काराचे वितरण दिल्ली येथे होणार आहे.

 

महानिर्मितीने नागपुरातील भांडेवाडी येथे सांडपाण्यावर पुन:प्रक्रिया प्रकल्प उभारला असून प्रक्रिया केलेले पाणी वीज केंद्राला वापरण्यात येते. पर्यायाने पेंच येथील शुद्ध पाण्याची बचत होते, शेतकरी व नागरिकांना पिण्यासाठी अधिक पाण्याची उपलब्धता झाली आहे व सोबतच गोसेखुर्द धरणाला नागनदीचे सांडपाणी जात नसल्याने पर्यावरणीय दृष्टीकोनातून मोठा हातभार लागला आहे.

 

कोराडी औष्णिक विद्युत केंद्राचे मुख्य अभियंता अभय हरणे यांच्या नेतृत्वाखाली कोराडी वीज केंद्रात पर्यावरण संरक्षण व संवर्धनाचे कार्य सातत्याने सुरु असते ज्यामध्ये  पर्यावरण विषयक परिसंवाद, कार्यशाळा, जनजागृती, वृक्षारोपण मोहीम तसेच विविध उपक्रमांचा समावेश असतो. या सर्व बाबी ध्यानात घेऊन ग्रीन मॅपल फाउंडेशनने कोराडी वीज केंद्राची ग्रीन पेटल-२०१८ या  पुरस्कारासाठी निवड केली आहे.   

 

विशेष म्हणजे, यावर्षी पर्यावरण संरक्षण व संवर्धन विषयक उल्लेखनीय कार्याबद्दल कोराडी औष्णिक विद्युत केंद्राला महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने फाईव्ह स्टार रेटिंग प्रमाणपत्र देऊन सन्मान केला आहे. तसेच मिशन एनर्जी फाउंडेशनचा राष्ट्रीय पुरस्कार देखील मिळाला आहे.

 

बातम्या आणखी आहेत...