आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

EPFO: तुमचे आधार UAN सोबत लिंक असेल तर PF साठी नाही करू शकणार ऑफलाइन क्लेम...

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - जर तुमचे आधार यूनीव्हर्सल अकाउंट नंबर म्हणजेच यूएएनसोबत लिंक आहे तर, तुम्ही तमचा प्रॉव्हिडेंट फंड ऑफलाइन क्लेम करू शकणार नाही. कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने अशा परिस्थित ऑफलाइन क्लेम स्वीकारण्यास  मनाई केली आहे.

 

कंपनी बल्कमध्ये जमा करते ऑफलाइन क्लेम 
ईपीएफओकडून जाहिर केलेल्या सर्कुलरमध्ये सांगण्यात आले आहे की, कंपनी बल्कमध्ये सगळ्यांचे क्लेम फिजकल फॉर्ममध्ये जमा करत आहेत. यामुळे फील्ड ऑफिसमध्ये अनावश्यक कामाचा बोझा वाढत आहे, आणि क्लेम सेटेलमेंटमध्ये उशीर होत आहे. यामुळे कंपनीचे ऑफलाइन क्लेम स्वीकार करणार नाहीत.

 

ऑफलाइन आणि ऑनलाइन क्लेम फाइल झाल्यावर ऑनलाइन क्लेम होईल सेटल 
सर्कुलरमध्ये सांगण्यात आले आहे की, एखाद्या मेंबरने जर ऑनलाइन आणि ऑफलाइन क्लेम फाइल केले तर त्याचे ऑनलाइन क्लेम सेटल होईल.

 

असे करा ऑनलाइन क्लेम 

 

स्‍टेप- 1
- ऑनलाइन क्‍लेम सबमिट करण्यासाठी तुम्हाल ईपीएफओची वेबसाइट http://www.epfindia.com/site_en/ वर जावे लागेल. येथे तुम्हाला ऑनलाइन क्‍लेम चे ऑप्‍शन दिसेल.

 

स्‍टेप- 2
- ऑनलाइन क्‍लेम ऑप्‍शनवर क्लिक केल्यावर https://unifiedportal-mem.epfindia.gov.in/memberinterface/ ही लिंक उघडेल. येथे तुम्हाला तुमचा यूनीव्हर्सल अकाउंट नंबर(यूएएन) आणि पासवर्ड फीड करावा लागेल. त्यानंतर क्‍लेम सबमिट करण्याचे ऑप्शन दिसेल. 

 

बातम्या आणखी आहेत...