आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • EPFO Warns Employees Against Political Influence

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

मोदी सरकारच्या शासनकाळात त्रस्त झाली EPFO, शिफारसींसाठी कर्मचारी टाकत आहेत राजकीय दबाव; पण EPCO ने दिली ही चेतावनी

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक


नवी दिल्ली : कर्मचारी भविष्य निधी संघटना अर्थात EPFO आपल्या कर्मचाऱ्यांकडून ट्रांसफर पोस्टिंगसाठी नेत्यांची शिफारस करण्याच्या सवयीमुळे त्रस्त झाली आहे. ईपीएफओने यावर बंधन घालण्यासाठी एक नवीन निर्देश जारी केला आहे. ईपीएफओने आपल्या निर्देशात सांगितले की, नोकरीसंदर्भात कर्मचाऱ्यांद्वारे आपल्या हितासाठी राजकीय किंवा बाहेरून दबाव टाकणे हे नियमानुसार चुकीचे आहे. त्यात पुढे सांगितले की, कर्मचारी किंवा त्यांच्या परिवारातील सदस्याने राजकीय किंवी बाहेरू दबाव टाकणे नोकरीच्या सेवेच्या नियमांचे उल्लंघन आहे आणि यामुळे नियमानुसार कर्मचाऱ्यांविरूद्ध कायदेशीर कारवाई केली जाऊ शकते. 

 
ट्रांसफर पोस्टिंगसाठी नेत्यांकडे शिफारस करत आहेत EPFO कर्मचारी

11 जानेवारी 2017 रोजी ईपीएफओने याबाबत आपल्या सर्व अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना आपल्या हितासाठी राजकीय किंवी अन्य बाहेरील दबाव टाकण्यापासून सावध राहण्याचा सल्ला दिला होता. ईपीएफओने जारी केलेल्या परिपत्रकात सांगितले आहे की, कर्मचारी मोठ्या प्रमाणात खासदार आणि मंत्र्यांना नोकरी संदर्भात थेट अहवाल देत आहेत आणि हे अहवाल ईपीएफओकडे येत आहे. कर्मचाऱ्याच्या परिवारातील सदस्य आपल्या ट्रांसफर पोस्टिंग किंवा नोकरी संदर्भाशी निगडीत प्रकरणातील तक्रारी थेट लोकनेत्यांकडे अर्जाद्वारे करत असल्याचे मोठ्या प्रमाणात समोर आले आहे.


EPFO ने दिली कारवाई करण्याचे चेतावनी 
ईपीएफओने परिपत्रकात सांगितले की, अधिकारी किंवा कर्मचारी नोकरीसंदर्भातील काही तक्रारी किंवा ट्रांसफर पोस्टिंगसंबंधीत प्रकरणात राजकीय किंवा बाहेरील दबावाचा आधार घेत असतील तर हे सेवेच्या नियमांचे उल्लंघन समजले जाणार आहे. अशात अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर कायदेशीर कारवाई होऊ शकते. 
 
5 कोटी सदस्यांच्या पीएफचे व्यवस्थापन करते ईपीएफओ  
ईपीएफओ भारत सरकारची रिटायरमेंट फंड बॉडी आहे आणि हे जवळपास 5 कोटी सदस्यांच्या 8 लाख कोटी रूपयांपेक्षा अधिक पीएफ फंडचे व्यवस्थापन करते. सध्याच्या घडीला ईपीएफओकडे 15 कोटींपेक्षा अधिक अॅक्टीव्ह आणि नॉन अॅक्टीव्ह सदस्य आहेत.