आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एरंडोल तालुक्यातील उत्राण येथे गारपीट, लिंबू पिकाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

एरंडोल - एरंडोल तालुक्यातील उत्राण परिसरात आज दुपारी 3 वाजुन 45 मिनिटांपासून चार वाजेपर्यंत जोरदार गारपीट झाल्याने परिसरातील लिंबू पिकाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. नुकत्याच झालेल्या अवकाळी पावसाच्या संकटातून सावरणाऱ्या शेतकऱ्यांपुढे आता हे नवीन अस्मानी संकट उभे राहिले आहे. 

गुरुवारी दुपारी 3 वाजुन 45 मिनिटांनी एरंडोल तथा परिसरात पावसाला सुरुवात झाली त्यात जवखेडे, अंतुर्ली, तळई या गावांसह तालुक्यातील लिंबूसाठी प्रसिद्ध असलेल्या उत्राण परिसरात पावसाने हजेरी लावली. यावेळी जोरदार गारपीट झाली असुन परिसरातील लिंबासह, हरबरा, गहु व पेरूचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. याबाबत एरंडोल पंचायत समितीचे उपसभापती अनिल महाजन यांनी तात्काळ प्रशासनाने या लिंबू बागांचे व पिकांचे पंचनामे करून शेतकऱ्यांना मदत द्यावी असे आवाहन केले आहे. नुकत्याच झालेल्या अवकाळी पावसातून सावरलेल्या शेतकऱ्यांपुढे आता हे पुन्हा अस्मानी संकट आले असल्याचेही त्यांनी सांगितले. दरम्यान उत्राण परिसरात गारपीट झाली असल्याचे फक्त एरंडोल तहसिलदार अर्चना खेतमाळीस व नायब तहसिलदार पी.एस.शिरसाठ यांनाच माहीत होते. तालुका कृषी अधिकारी शरद बोरसे हे जळगाव येथे गेले असल्याने त्यांना याबाबत माहिती नसल्याचे त्यांनी सांगितले.
 

बातम्या आणखी आहेत...