आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एस्केलेटरमध्ये अडकला मुलाचा हात, वेदनेमुळे विव्हळला, लगेचच न्यावे लागले हॉस्पिटलमध्ये

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

न्यूज डेस्क - उत्तरप्रदेशच्या आगरामध्ये शनिवारी एक अत्यंत दुर्दैवी घटना घडली. आगरा कँट रेल्वे स्टेशनवर लागलेल्या एस्केलेटरमध्ये एका मुलाचा हात अडकला होता. मुलगा ओरडू लागला तेव्हा लगेच एस्केलेटर बंद केले. त्यानंतर मुलाचा हात बाहेर काढण्यात आला. सुदैवाची बाब म्हणजे मुलाच्या हात वाचला आहे. त्याला सध्या रुग्णालयात दाखल करण्यात आलेले आहे. लिफ्ट एस्केलेटरमध्ये अशा घटना अनेकदा घडत असतात. पण काही खबरदारी घेतल्या नाही तर जीवालाही धोका निर्माण होऊ शकतो. ओमेगा एलिव्हेटर (इंदूर) चे इंजिनीअर स्वप्निल जोशी यांच्याशी बोलून आम्ही एस्केलेटर वापरताना काय खबरदारी घ्यावी याची माहिती घेतली आहे. 


काय म्हणाले एक्सपर्ट.. अशी घ्या काळजी 
- इंजीनियर जोशी यांनी सांगितले की, एस्केलेटरमध्ये दोन्ही बाजुला सपोर्टसाठी जे रेलिंग अशते त्याच्याखाली ब्रश लावलेले असतात. त्यात थोडा गॅप असतो. त्यामुळे याठिकाणी ओढणी, साडी, कपडा किंवा मोठा गॅप असेल तर हातही अडकू शकतो. त्यामुळे कधीही एस्केलेटर वापरताना हात खालच्या बाजुला ठेवू नका. रेलिंगच्या वरच ठेवा. 
- कपडे, ओढणी, साडी याची काळजी घ्या, ते गॅपमध्ये अडकू शकतात. 
- एस्केलेटर टू-वे हॉरिझंटल आणि थ्री-वे हॉरिझंटलही असतात. टू-वे मध्ये दोन पायऱ्या एकत्र सुरू होतात. नंतर त्या सेपरेट स्टेपरमध्ये बदलतात. असा परिस्थितीत तुम्ही जेव्हा एस्केलेटरवर चढत असाल तेव्हा पायऱ्या ज्याठिकाणी एकमेकिंना चिटकलेल्या असेल तेव्हा त्यावर पाय ठेवू नका. अशावेळी बॅलेन्स बिघडल्यामुळे तुम्ही पडू शकता. तुमचे पाय नेहमी एकाच पायरीच्या मध्यभागी ठेवा. 
- 10 वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांना एकटे एस्केलेटरवर चढू देऊ नका. त्यांना कडेवर घेऊनच चढा किंवा उतरा. 
- साधारणपणे एक एस्केलेटर 2.5 सेकंदात 1 मीटर जाते. वेगवेगळ्या ठिकाणी याची स्पीड वेगवेगळी असते. तसे पाहता ही स्पीड फार धोकादायक नसते. तरीही एस्केलेटर चालता चालता थांबले तर तुमचे बॅलेन्स बिघडू शकते. त्यामुळे रेलिंगच्या सहाऱ्यानेच एस्केलटरमध्ये वर-खाली जावे. 
- फार गर्दी असेल तर शक्यतो एस्केलेटरचा वापर करू नका. गर्दी जास्त असल्यास एखाद्याचे बॅलेन्स गेले तर त्याच्याबरोबर तुमचाही अपघात होऊ शकतो. 
- मुलांबरोबरच कोणत्याही वयस्कर व्यक्तीला एस्केलेटरवर एकटे जाऊ देऊ नका. 
- ज्या एस्केलेटरवर मेंटेनेन्सची वॉर्निंग लावलेली असले त्यावर बंद असेल तरी जाऊ नका. त्याठिकाणी अपघात गोण्याची शक्यता असते. 

 

बातम्या आणखी आहेत...