Home | News | Esha Gupta Angry on the question of friendship with Hardik Pandya

हार्दिक पंड्याचे नाव ऐकताच भडकली बॉलिवूड अभिनेत्री, म्हणाली, 'तो माझा मित्र नाही', काही महिन्यांअगोदर याच हीरोइनसोबत जोडले गेले होते पंड्याचे नाव 

दिव्य मराठी वेब टीम  | Update - Jan 15, 2019, 12:10 AM IST

हार्दिकच्या वादग्रस्त वक्तव्यामुळे एक टीव्ही अभिनेत्रीने साधला करण जोहरवर निशाणा... 

 • Esha Gupta Angry on the question of friendship with Hardik Pandya

  एंटरटेनमेंट डेस्क : प्रसिद्ध चॅट शो 'कॉफी विद करण' मध्ये वादग्रस्त वक्तव्य करणारा क्रिकेटर हार्दिक पांड्याचे प्रॉब्लेम्स काही केल्या कमी होत नाहीत. आता त्याच्यावर बॉलिवूड अभिनेत्री ईशा गुप्ताने निशाणा साधला आहे. एका इवेंटमध्ये जेव्हा ईशाला हार्दिकसोबतमैत्रीविषयी प्रश्न विचारला गेला तेव्हा ती भडकली आणि रागात म्हणाली, 'तुम्हाला कुणी सांगितले की, तो माझा मित्र आहे. महिलांविषयी तो जे बोलला आहे त्याचे समर्थनच करत येणार नाही'. काही महिन्यांपूर्वी अशा चर्चा होत होत्या की, ईशा, हार्दिकला डेट करत आहे.

  टीव्ही अभिनेत्रीनेही काढला राग...
  - टीव्ही शो 'इश्कबाज' ची अभिनेत्री श्रेनु पारेखसुद्धा हार्दिकच्या या वक्तव्यामुळे भडकलेली आहे. ती म्हणाली, 'शोदरम्यान हार्दिकने स्वतःला खूप कूल दाखवण्याचा प्रयत्न केला पण असे काहीही करण्यात तो यशस्वी झालेला नाही. हार्दिक-राहुल खूप इम्मीच्योर वाटले. त्यांनी या गोष्टीचे भान ठेवायला हवे होते की, ते देशाला रिप्रेजेंट करतात आणि असे वक्तव्य करण्याआधी एकदा विचार करायला हवा होता'.

  - श्रेनु म्हणाली, 'मला माहित आहे की, शोचा फॉरमॅट खूप वेगळा आहे. हा कोणताही लाइव्ह शो नाही. शोचे होस्टने याकगही काळजी हवी होती अशा गोष्टींना प्रोत्साहन देऊ नये. कमीत कमी शोमधून अशा पोर्शनला एडिट तरी केले पाहिजे.

  काय होते पुर्ण प्रकरण...
  25 वर्षांचा हार्दिक पांड्या करण जोहरचा टॉक शो कॉफी विद करणमध्ये त्याचासोबती क्रिकेटर राहुल केसोबत सहभागी झाला होता. यामध्ये त्याने महिलांसंबंधीत प्रश्नांवर त्याची वादग्रस्त प्रतिक्रिया दिली. यामुळे सोशल मीडियावर त्याच्यावर निशाना साधण्यात आला. हे प्रकरण खुप वाढले आणि बीसीसीआयला नोटीस जारी करावी लागली. हार्दिक शोमध्ये म्हणाला होता की, त्याचे अनेक महिलांसोबत संबंध आहेत. या व्यक्तव्यामुळे कॅप्टन विराट कोहलीसोबतच पुर्ण टीने स्वतःला वेगळे ठेवले होते. विराट म्हणाला होता की, "भारतीय क्रिकेट टीम आणि जबाबदार क्रिकेटर्सच्या नात्याने आम्ही त्याच्या विचारांसोबत सहमत नाही. तो जे काही बोलला ते पर्सनल आहे."

  हार्दिकने ट्वीट करुन मागितली होती माफी...
  वादानंतर हार्दिक माफी मागताना म्हणाला होता, "मी एका चॅट शोवर गेलो होतो. मी काही व्यक्तव्य केले. यादरम्यान मी कुणाच्या भावनांना ठेच पोहोचू शकते याचा विचार केला नाही. मी याची मनापासून माफी मागतो. मी तुम्हाला विश्वासाने सांगतो की, मी वाईट हेतूने किंवा समाजाच्या एखाद्या वर्गाला वाईट दर्शवण्यासाठी असे केले नाही. प्रामाणिकपणे सांगतो की, मी शोच्या नेचरनुसार त्यामध्ये वहावत गेलो. कुणाच्या भावनांचा अपमान करणे किंवा कुणाला दुःख पोहोचवण्याचा माझा हेतू नव्हता." हार्दिकच्या वादग्रस्त वक्तव्यानंतर बीसीसीआयने त्याच्यावर काही मॅचसाठी प्रतिबंधही लावले आहेत.

Trending