आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जगातील 100 सर्वाधिक चर्चित खेळाडूंमध्ये फक्त नऊ भारतीय; विराट कोहली सातव्या स्थानी-धोनी 13व्या स्थानी

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

ब्रिस्टल - पोर्तुगालचा दिग्गज फुटबॉलपटू क्रिस्टियानो रोनाल्डो क्रीडा क्षेत्रात जगात सर्वात चर्चित खेळाडू आहे. दुसऱ्या स्थानावर अमेरिकन बास्केटबॉलपटू लेब्रन जेम्स आणि तिसऱ्या स्थानी अर्जेंटिनाचा फुटबॉलर लियोनल मेसीचा नंबर लागतो. जगातील १०० चर्चित खेळाडूंची वर्ल्ड फेम १०० ही यादी ईएसपीएनने जाहीर केली. यादीत खेळाडूंची क्रमवारी ठरवण्यासाठी तीन निकष ठेवण्यात आले होते. 


पहिला - कोणत्या खेळाडूला गुगलवर सर्वाधिक सर्च केले. त्याआधारे त्यांना १०० गुण देण्यात आले. यात रोनाल्डोला १०० गुण मिळाले. दुसरा - करारातून खेळाडूंना मिळणारी कमाई. 
तिसरा - खेळाडूंच्या सोशल मीडियावरील फॉलोअर्सची संख्या पाहण्यात आली. या तिन्ही गोष्टींच्या आधारे त्यांची क्रमवारी ठरवली. ७८ देशांच्या ८०० खेळाडूंमधून अव्वल १०० खेळाडूंची यादी तयार करण्यात आली. यादीत ब्राझीलचा फुटबॉलर नेमार चौथ्या आणि आयर्लंडचा फायटर कोनोर मॅग्रिगोर पाचव्या स्थानावर आहे. 


अव्वल १०० खेळाडूंमध्ये केवळ ९ भारतीयांचा समावेश आहे. विराट कोहली सातव्या स्थानावर असून भारतीयांमध्ये अव्वल आहे. त्यानंतर महेंद्रसिंग धोनी १३ व्या, युवराजसिंग १८ व्या, सुरेश रैना २२ व्या, रविचंद्रन अश्विन ४२ व्या स्थानावर आहेत. त्यांच्यासह रोहित शर्मा, हरभजनसिंग, शिखर धवन आणि टेनिस स्टार सानिया मिर्झा या खेळाडूंचादेखील नावे आहेत. 


जगातील अव्वल पाच खेळाडू 
१ रोनाल्डो, फुटबॉल (पोर्तुगाल)  
२ जेम्स, बास्केटबॉल (अमेरिका)
३ मेसी, फुटबॉल (अर्जेंटिना)
४ नेमार, फुटबॉल (ब्राझील)
५ मॅग्रिगोर, एमएमए (आयर्लंड) 

बातम्या आणखी आहेत...