आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करापुणे - जनतेने भाजप-शिवसेनेला स्पष्ट जनादेश दिला आहे. मात्र त्यांच्यात सत्तास्थापनेबाबत सुंदोपसुंदी सुरू आहे. या पार्श्वभूमीवर हिंदू संघटना डॅमेज कंट्रोलसाठी सरसावल्या आहेत. ‘दोन्ही पक्षांनी एक पाऊल मागे घेत युतीनेच लवकरात लवकर सत्ता स्थापन करावी, अन्यथा गंभीर परिणामाला सामोरे जा,’ असा इशारा त्यांनी पत्रकार परिषदेद्वारे बुधवारी भाजप-शिवसेनेला दिला आहे.
या पत्रकार परिषदेला हिंदू महासभा, समस्त हिंदू आघाडी, हिंदू एकता आंदोलन, हिंदू जनजागृती समिती, राष्ट्रीय वारकरी परिषद, राजे शिवराय प्रतिष्ठान, हिंदू राष्ट्रसेना आदी संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.
‘भाजप-शिवसेना एकत्र येत नसल्याने जनतेत नाराजी आहे. या नाराजीचे रूपांतर रागात हाेऊ शकते. भविष्यात या दाेन्ही पक्षांविरोधात आम्ही प्रचार यंत्रणा राबवू,’ असा इशारा या संघटनांनी दिला. भाजप-शिवसेनेची हिंदुत्ववादाची भूमिका परस्परपूरक असन दोन्ही पक्षांची नैसर्गिक युती आहे. सेनेने केवळ राजकीय स्वार्थासाठी राष्ट्रवादी व काँग्रेससोबत घरोबा करणे अयाेग्य आहे,’ असे संघटनांचे म्हणणे आहे.
साेनियाजी, शिवसेनेसाेबत आघाडी नकाे! : मुस्लिम संघटना
संगमनेर - नगर जिल्ह्यातील संगमनेरच्या मुस्लिम संघटनेने काँग्रेस अध्यक्षा साेनिया गांधी यांना एक पत्र पाठवून सत्तेसाठी शिवसेनेशी आघाडी करू नका, अशी विनंती केली आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थाेरात यांचा मतदारसंघ असलेल्या संगमनेरमधील या संघटनेच्या १०० कार्यकर्त्यांच्या निवेदनावर स्वाक्षऱ्या आहेत.
‘मुस्लिम समाज हा काँग्रेसचा पारंपरिक मतदार आहे. मात्र सध्याच्या काळात सत्तेसाठी काँग्रेस, राष्ट्रवादीची शिवसेनेशी वाढत असलेली जवळीक ही चिंतेची बाब आहे. आम्ही कायमच जातीयवादी पक्ष भाजप-शिवसेनेविराेधात भूमिका आहाेत. जर केवळ सत्तेसाठी काँग्रेसच्या नेत्यांनी शिवसेनेशी हातमिळवणी केली तर या पक्षांशी लढत असलेल्या स्थानिक पदाधिकाऱ्यांचीही अडचण हाेईल,’ असे निवेदनात नमूद केले आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.