आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Establish Special Courts In Districts Where More Than 100 Poxo Cases; Supreme Court Order

१०० पेक्षा जास्त पोक्सो खटले असलेल्या जिल्ह्यांत विशेष कोर्ट स्थापन करा; सुप्रीम कोर्टाचे आदेश

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली  - देशातील ज्या जिल्ह्यांत बाललैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यांंतर्गत (पोक्सो) १०० हून जास्त खटले प्रलंबित आहेत अशा जिल्ह्यांत  ६० दिवसांत विशेष न्यायालय स्थापन करण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने गुरुवारी दिले. या न्यायालयांचा खर्च केंद्र उचलेल. पोस्को कायद्याशी संबंधित सर्व प्रकरणाचे फॉरेन्सिक अहवाल मुदतीत पाठवावेत, असे निर्देश कोर्टाने राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांच्या मुख्य सचिवांना दिले आहेत. देशभरात मुलांवरील अत्याचाराचे वाढत्या प्रकारावर सुनावणी करताना कोर्टाने म्हटले की, पोस्को खटल्यासाठी केंद्र सरकारने प्रशिक्षित आणि संवेदनशील वकील नेमावेत.