आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पोहरादेवीच्या विकासासाठी अाणखी 100 कोटी देणार, बंजारा अकादमी स्थापन करणार : मुख्यमंत्री

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पोहरादेवी (वाशिम) - बंजारा समाजाचे श्रद्धास्थान असलेल्या वाशिम जिल्ह्यातील पोहरादेवी येथील प्रस्तावित १२५ कोटींच्या विकास आराखड्यातील २५ कोटींच्या विकासकामांचे भूमिपूजन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते साेमवारी पार पडले. या विकासकामांच्या उर्वरित १०० कोटी रुपयांचा निधीही लवकरच देण्याची घाेषणा मुख्यमंत्र्यांनी या वेळी केली. 


पोहरादेवी (जि. वाशीम) येथील संत सेवालाल महाराज नंगारा वस्तुसंग्रहालयाच्या भूमिपूजनप्रसंगी मुख्यमंत्री बाेलत हाेते. बंजारा समाजातील विद्यार्थ्यांना परदेशी शिक्षणासाठी शिष्यवृत्ती देण्याची, बंजारा अकादमी स्थापन करण्याची घोषणाही त्यांनी केली.संत डॉ. रामराव बापू, वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार, ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे, राज्यमंत्री डाॅ. रणजित पाटील, दादाजी भुसे, मदन येरावार, वाशिम जिल्ह्याचे पालकमंत्री संजय राठाेड, खासदार भावना गवळी, प्रताप जाधव, संजय धोत्रे, अामदार मनोहरराव नाईक अादींची उपस्थिती हाेती. बंजारा समाजाला अन्य राज्यांप्रमाणे अनुसूचित जमाती प्रवर्गात समाविष्ट करण्यासोबतच बंजारा कला अकादमी, बंजारा भाषेचा आठव्या सूचीत समावेश, बंजारा समाजातील कलाकुसरीच्या कामांसाठी बंजारा क्लस्टर व अन्य मागण्यांसंदर्भात राज्य शासन केंद्राकडे प्रस्ताव पाठवू, यवतमाळ- नांदेड रेल्वे मार्गावर पोहरागड येथे स्टेशन राहणार असल्याचे ते म्हणाले. मुख्यमंत्री व ठाकरे यांचे आगमन होताच बंजारा समाजातील मुलींनी पारंपरिक वेशभूषेत मान्यवरांचे स्वागत केले. या वेळी संपूर्ण परिसर 'एकच लाल सेवालाल' या जयघोषाने दणाणून गेला होता. या सोहळ्यासाठी देशातील विविध राज्यातून लाखो बंजारा भाविक एकत्रित आले होते. 

 

गेले चार वर्षे सत्तेत एकत्र असूनही एकमेकांविराेधात षड्डू ठाेकून उभे राहणारे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात अाता निवडणुकीच्या ताेंडावर जवळीक निर्माण हाेऊ लागली अाहे. साेमवारी बंजारा समाजाचे श्रद्धास्थान असलेल्या पाेहरादेवी (जि. वाशिम) येथे एका कार्यक्रमाच्या निमित्ताने एकत्र अालेल्या ठाकरे- फडणवीसांनी एकत्रित 'नगारा' वाजवून भविष्यात पुन्हा युतीचे संकेत दिले. 


बंजारा समाजाने एल्गार पुकारण्याआधी समस्या सोडवा : उद्धव ठाकरे 
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी या सोहळ्यावेळी 'जय सेवालाल' असा नारा देत आपल्या भाषणाची सुरुवात केली. शूरवीर बंजारा समाज अद्यापही शांत आहे. त्यांनी कोणत्याही प्रकारचा एल्गार पुकारण्याआधी त्यांच्या ज्या काही मागण्या आहेत त्या पूर्ण करा, अशा सूचना ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना केल्या. बंजारा समाजाला शिक्षणासह मूलभूत सोई-सुविधा सरकार उपलब्ध करून देईल, असे अाश्वासनही त्यांनी दिले. 

बातम्या आणखी आहेत...