आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ऑनलाइन मीडियासाठी डिजिटल न्यूज पब्लिशर्स असोसिएशनची स्थापना

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली- देशातील १० सर्वात मोठ्या मीडिया कंपन्यांनी डिजिटल न्यूज पब्लिशर्स असोसिएशन (डीएनपीए) नावाने संघटनेची स्थापना केली आहे. डिजिटल न्यूजच्या ७०% वाचकांपर्यंत यांची पोहोच आहे. असोसिएशन स्थापन करण्याचा उद्देश ऑनलाइन न्यूज मीडियाला प्रोत्साहन देणे, डिजिटल न्यूज पब्लिशर्सना प्रोत्साहित करणे, त्यांची मदत करणे आणि त्यांच्या व्यावसायिक आणि संपादकीय हितांचे रक्षण करणे हा आहे. ही संघटना ऑनलाइन न्यूज मीडियासाठी सेल्फ नियामक म्हणूनही काम करेल. 


असोसिएशनच्या संस्थापक सदस्यांमध्ये दैनिक भास्कर, इंडिया टुडे ग्रुप, एनडीटीव्ही, हिंदुस्तान टाइम्स, इंडियन एक्स्प्रेस, टाइम्स ऑफ इंडिया, अमर उजाला, दैनिक जागरण, इनाडू आणि मल्याळम मनोरमा यांचा समावेश आहे. इतर ऑनलाइन न्यूज पब्लिशरदेखील या संघटनेचे सदस्य होऊ शकतात. लोकांना विश्वसनीय बातमी देण्यासाठी आम्ही कटिबद्ध असल्याचे असोसिएशनच्या वतीने सांगण्यात आले आहे. ही असोसिएशन बातमी अाणि इतर माहितीच्या क्षेत्रात होणाऱ्या विकासाची माहिती सदस्य आणि सामान्यांपर्यंत पोहोचवणार आहे. उद्योगातील सध्याच्या आणि भावी संधीसाठी सदस्यांमध्ये ताळमेळ ठेवणे हादेखील यामागचा एक उद्देश असून यातून या संधीचा जास्तीत जास्त फायदा घेतला जाईल. 


डिजिटल न्यूज उद्योगासाठी ऐतिहासिक निर्णय 
असोसिएशनची स्थापना डिजिटल न्यूज उद्योगासाठी ऐतिहासिक निर्णय आहे. याचे संस्थापक सदस्य असल्याचा आम्हाला गर्व आहे. उद्योग आणि ग्राहकांच्या हितासाठी मोठ्या पब्लिशर्सनी एकत्र येणे ही मोठी बाब आहे. 
-पवन अग्रवाल, डेप्युटी एमडी, दैनिक भास्कर समूह 

बातम्या आणखी आहेत...