आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Estimates Of One And A Half Lac Literary Lovers To Come To The Marathi Sahitya Sammelan At Usmanabad;

संमेलनाला दीड लाख साहित्यप्रेमी येण्याचा अंदाज, 10 हजार क्षमतेच्या मुख्य मंडपाच्या कामाला सुरुवात, ग्रंथ दालनासह चार मंडपांच्या उभारणीला सुरुवात

2 वर्षांपूर्वीलेखक: प्रतिनिधी
  • कॉपी लिंक
अ. भा. मराठी साहित्य संमेलनासाठी मुख्य मंडप उभारणीचे काम सुरू असून याशिवाय आणखीही चार मंडप उभारले जाणार आहेत. - Divya Marathi
अ. भा. मराठी साहित्य संमेलनासाठी मुख्य मंडप उभारणीचे काम सुरू असून याशिवाय आणखीही चार मंडप उभारले जाणार आहेत.

उस्मानाबाद : १०, ११ व १२ जानेवारी २०२० दरम्यान होणाऱ्या ९३ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाची जोरदार तयारी सुरू झाली आहे. शहरातील जिल्हा परिषद कन्या (मल्टी पर्पज) शाळेच्या पाठीमागील भागात मोकळ्या मैदानावर सुमारे १० हजार रसिक-साहित्यिक बसतील इतक्या आकाराचा भव्य मुख्य मंडप उभारण्यात येत आहे. याच शाळेच्या प्रांगणात मंडप क्रमांक दोन आणि ग्रंथ दालन उभारत आहे. तर शाळेच्या आतील प्रांगणात मंडप क्रमांक ३ ची रचना करण्यात येत आहे. संमेलनासाठी सुमारे दीड लाख रसिक-साहित्यिक उपस्थित राहतील, असा अंदाज असून, त्यादृष्टीने नियोजन करण्यात येत असल्याचे साहित्य संमेलनाचे स्वागताध्यक्ष नितीन तावडे यांनी 'दिव्य मराठी'ला सांगितले.

उस्मानाबादच्या इतिहासात प्रथमच अखिल भारतीय पातळीवरील साहित्य संमेलन होत आहे. संमेलन आयोजकांनीही संमेलन अत्यंत दिमाखदारपणे साजरे करण्याची भूमिका घेतली असून, त्यादृष्टीने जोरदार प्रयत्न करण्यात येत आहेत. जिल्हा परिषद कन्या शाळेच्या प्रांगणात आणि पाठीमागील सरकारी जागेत संमेलनाचा उत्सव पार पडणार आहे. शाळेच्या मागील जागेत सुमारे १० हजार रसिक-साहित्यिकांच्या क्षमतेचा मंडप उभारण्यात येत आहे. मंडप उभारणीचे काम सोलापूर येथील कंपनीकडून करण्यात येत आहे. कन्या शाळेच्या प्रांगणात सुमारे २५० स्टॉल्सचे ग्रंथदालन उभारण्यात येणार आहे. ग्रंथदालनाचेही काम सुरू झाले आहे. क्रमांक दोन मंडपही याच प्रांगणात असून, तिथे ५०० ते ७०० रसिक-साहित्यिकांच्या क्षमतेचा मंडप असेल. या मंडपामध्ये परिसंवाद होतील. शाळेच्या अातील प्रांगणात कवीकट्ट्याचा मंडप उभारण्यात येत आहे.

उस्मानाबादी जामुनसह मराठमोळा मेनू 

उस्मानाबादमध्ये संमेलनाची घोषणा झाली त्यावेळी जिल्ह्यावर दुष्काळाचे सावट होते. आता मात्र, परिस्थिती बदलली आहे. मात्र, आम्ही पिठलं-भाकरी खाऊ घालू, पण अभ्यागतांचे सन्मानपूर्वक स्वागत करू, अशी भूमिका आणि निर्धार आयोजकांनी केला होता. आता साहित्यिक-रसिकांना तीन दिवस वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्या, भात, चपाती आणि उस्मानाबादची ओळख असलेल्या गुलाबजामूनचा यात अग्रक्रमाने समावेश असणार आहे.

निमंत्रितांसाठी हॉटेल्स बुक

साहित्य संमेलनासाठी परगावहून येणाऱ्या निमंत्रितांसाठी, संमेलन प्रतिनिधींसाठी शहरातील सर्व प्रमुख हॉटेल्स बुक करण्यात आली आहेत. कार्यालयाकडून संमेलनाच्या वार्तांकनासाठी नियुक्त केलेल्या पत्रकारांसाठीही निवास आणि भोजन व्यवस्था करण्यात आली आहे. भरगच्च कार्यक्रमांमुळे शहरवासीयांनाही साहित्य पर्वणी मिळणार आहे.
 

बातम्या आणखी आहेत...