आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
न्यूज डेस्क - इथिओपियाचे पंतप्रधान अबीय अहमद यांना शांततेचा नोबेल जाहीर करण्यात आला आहे. त्यांनी आपले सर्वात कट्टर शत्रू राष्ट्र एरिट्रियासोबत यशस्वीरित्या शांतता करार केला. त्यासाठीच प्रामुख्याने त्यांना हा पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. नुकतेच घेतलेल्या त्यांच्या या निर्णयाचे आणि सीमाप्रश्न सोडवण्याच्या शांततापूर्वक प्रक्रियेचे जगभरात कौतुक करण्यात आले. शांततेचा नोबेल मिळवण्यासाठी जगभरातून एकूणच 301 उमेदवारांचे अर्ज आले होते. त्यामध्ये 223 व्यक्ती आणि 78 संघटनांचा समावेश होता.
शांततेच्या नोबेलशी संबंधित काही तथ्य
1901 पासून 2018 पर्यंत 99 शांततेचे पुरस्कार देण्यात आले आहेत. मिळवणाऱ्यांमध्ये 133 लोक, संस्था आणि संघटनांचा समावेश आहे. 19 वेळा तर या पुरस्कारांची औपचारिक घोषणा देखील करण्यात आली नाही. शांततेचे नोबेल मिळवलेल्यांमध्ये 17 महिला आणि 89 पुरुषांचा समावेश आहे. तर 27 संस्था/संघटनांना देखील हा पुरस्कार देण्यात आला. पाकिस्तानची मलाला युसूफझई हिला सर्वात कमी 17 व्या वर्षी शांतता पुरस्कार प्रदान करण्यात आला. 2014 मध्ये तिला आणि भारतातील बाल लैंगिक शोषणाविरुद्ध काम करणारे कैलाश सत्यार्थी यांना हा पुरस्कार संयुक्तरित्या देण्यात आला होता. ब्रिटनचे जोसेफ रोटब्लॅट 87 हे पुरस्कार मिळवणारे सर्वात ज्येष्ठ व्यक्ती मानले जातात. त्यांना 1995 मध्ये शांततेचा नोबेल देण्यात आला होता. हा पुरस्कार आतापर्यंत केवळ दोनच भारतीयांना मिळाला. यातील दुसरे नाव मदर टेरेसा असे आहे.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.