आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

या ठिकाणी 1 जानेवारीला नाही तर 11 सप्टेंबर रोजी साजरे करतात नवीन वर्ष, जगापेक्षा 8 वर्षांनी मागे चालतो हो देश; 11 सप्टेंबर रोजी करण्यात आले 2011 चे स्वागत

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक


इथियोपिया : सर्व जगात 2019 या नवीन वर्षाचे नुकतेच स्वागत करण्यात आले. पण जगातील एका देशात 2011 चे स्वागत करण्यात आले. म्हणजेच हा देश इतर देशांपेक्षा 8 वर्षांनी मागे आहे. इतकेच नाही तर या देशात 12 महिन्यांचे नाही तर 13 महिन्यांचे एक वर्ष असते. 

 

आफ्रिकेतील इथियोपिया या देशात 2011 या नवीन वर्षाचे स्वागत करण्यात येणार आहे. इथियोपिया हा आफ्रिकेतील सर्वाधिक लोकसंख्या असलेला दुसऱ्या क्रमांकाचा देश आहे. येथील लोकसंख्या जवळपास 10 कोटीच्या घरात आहे. इथियोपिया जगातील इतर देशांच्या तुलनेत सर्वात वेगळा देश आहे. येथील नववर्ष 1 जानेवारीला नाही तर 11 सम्टेंबर रोजी साजरे करण्यात येते. 

 

कॉप्टिक कॅलेंडरचा करतात वापर

या देशामध्ये कॉप्टिक कॅलेंडरनुसार दिवस, महिने आणि वर्षांची गणना होत असते. तर इतर देशांमध्ये ग्रिगोरियन कॅलेंडरनुसार गणना करतात. पोक ग्रेगोरी यांनी इ.स.1582 मध्ये ग्रिगोरियन कॅलेंडरची निर्मीती करण्यात आली होती. याआधी ज्यूलियन कॅलेंडरचा वापर करण्यात येत होता. 

 

7BC मध्ये येशू ख्रिस्तांचा जन्म झाल्याची मान्यता

इथियोपियाच्या लोकांच्या मते येशू ख्रिस्त यांचा जन्म 7 BC मध्ये झाला होता आणि या हिशोबाने येथील दिवसांची गणना सुरू झाली. यावरच कॉप्टिक कॅलेंडर तयार करण्यात आले. तर येशू ख्रिस्त यांचा जन्म AD1 मध्ये झाल्याचे जगातील इतर देशांमध्ये सांगण्यात येते. यामुळेच इथियोपियाचे कॅलेंडर जगातील इतर देशांपेक्षा 7-8 वर्षांनी मागे आहे. 

 

25 डिसेंबर नाही तर 7 जानेवारीला साजरा करतात ख्रिसमस

इथियोपियामध्ये फक्त नवे वर्षच नाही तर अनेक सण देखील वेगवेगळ्या तारखेला साजरे करण्यात येतात. येथे ख्रिसमस 25 डिसेंबरला नाही कर 7 जानेवारी रोजी साजरा करण्यात येतो.