आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

युरोपियन युनियनचा पाकला झटका; भारतात दहशतवादी काही चंद्रावरून पडत नाहीत, पाकमधूनच येतात!

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

ब्रसेल्स - भारताने जम्मू आणि काश्मीरातून कलम 370 हटवल्यानंतर जगभरातील देशांकडे दाद मागू पाहणाऱ्या पाकिस्तानला युरोपियन युनियनने (ईयू) झटका दिला. काश्मीर मुद्द्यावर पोलंड आणि इटलीसह युरोपियन युनियनच्या सदस्य राष्ट्रांनी पाकिस्तानला विरोध केला. भारत आणि पाकिस्तानच्या द्विपक्षीय मुद्द्यांवर तोडगा हा चर्चेतूनच काढण्यात यावा असे मत त्यांनी व्यक्त केले. ईयूच्या संसदेने दोन्ही देशांच्या सीमांपलिकडील नागरिकांचे अधिकार सुरक्षित ठेवावे असे आवाहन केले. तर पोलंडच्या समूहाने भारताला सर्वात मोठा लोकशाही देश म्हटले आहे. सोबतच, जम्मू आणि काश्मीरात होणाऱ्या पाकिस्तानच्या दहशतवादी कारवायांवर सर्वांचे लक्ष वेधले.

भारतात दहशतवादी काही चंद्रावरून पडत नाहीत...
पोलंडच्या ग्रुपने सांगितले, की भारतात दहशतवादी काही चंद्रावरून पडत नाहीत. ते भारताच्या शेजारील देशातूनच येतात. आम्ही पूर्णपणे भारताच्या पाठीशी आहोत. इटलीच्या युरोपियन पीपल्स पार्टीचे नेते फुलविओ मार्तुसिएलो यांनी सांगितले, की पाकिस्तान नेहमीच अण्वस्त्रांची धमकी देत आहे. युरोपावर हल्ला करण्याचे कटकारस्थान रचणारे दहशतवादी सुद्धा पाकिस्तानातच राहतात. पाकिस्तानात होणाऱ्या मानवाधिकार उल्लंघनाचा उल्लेख देखील यावेळी त्यांनी केला आहे. उल्लेखनीय बाब म्हणजे, काश्मीरातून कलम 370 हटल्यानंतर पाकिस्तान जगात एकाकी पडला. ज्या देशास पाकिस्तान आपला सर्वात जवळचा मित्र मानतो त्या संयुक्त अरब अमिरात आणि सौदी अरेबियाने सुद्धा पाकिस्तानची साथ सोडली. जी-7 देशांचा समूह आणि अमेरिकेने सुद्धा काश्मीरला दोन्ही देशांचा अंतर्गत मुद्दा म्हणत पाकिस्तानला दूर केले आहे.

बातम्या आणखी आहेत...