आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • International
  • European Parliament Election: The Green Party Is The Fourth Largest Party, The Ruling Party Lost Majority

युरोपीय संसद निवडणूक : ग्रीन पार्टी ठरली चौथा मोठा पक्ष, सत्ताधारी पक्षांनी गमावले बहुमत

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

व्हॅटिकन सिटी - युरोपीय संघाच्या संसदीय निवडणुकीत प्रमुख पक्षांनी लोकाश्रय जणू गमावल्याचे चित्र आहे. पारंपरिक सत्ताधारी सेंट्रिस्ट आघाडीने बहुमत गमावले. उजवी विचारसरणी व पर्यावरण समर्थक पक्षांचा निवडणुकीत विस्तार झाला. पर्यावरण, लोकशाही व मानवी हक्काच्या बाजूने असलेल्या ग्रीन पार्टीचा संपूर्ण युरोपात प्रभाव वाढला. ग्रीन पार्टी सर्वात मोठा चौथा पक्ष म्हणून उदयाला आला आहे. या पक्षाला ७० जागा मिळाल्या. आता ग्रीन पार्टीच्या पाठिंब्याशिवाय युरोपची दशा व दिशा ठरवणे सोपे नाही. निवडणुकीचा निकाल काही ठिकाणी ध्रुवीकरणाचेही संकेत देणारा आहे. कारण पारंपरिक व मुख्य पक्षांनी (सेंटर राइट व सेंटर लेफ्ट) २०१४ च्या तुलनेत जास्त जागा गमावल्या आहेत. युरोपीय संघ विरोधी व समाजवादी पक्षांच्या जागा २०१४ च्या तुलनेत २० टक्क्यांवरून २५ टक्क्यांवर पोहोचले. त्यातही इटली, हंगेरी, फ्रान्स, स्वीडन, बल्गारिया, पोलंडसारख्या देशांत या पक्षांना आघाडी मिळाली आहे. 

 

७० जागा गमावल्या
निवडणुकीपूर्वी युरोपियन पीपल्स पार्टी (ईपीपी) व डेमोक्रॅटिक (एस अँड डी) पक्षाकडे ५४ टक्के जागा होत्या. आता त्या घटून ४३ टक्के झाल्या आहेत. या दोन्ही पक्षांना ७० टक्के जागा गमावाव्या लागल्या. दोन्ही पक्ष बहुमतासह सत्तेवर होत्या. २०१४ मध्ये युरोपीय कमिशनचे अध्यक्षपद ईपीपीकडे होते. २०१९ च्या निवडणुकीत कोणत्याही आघाडीकडे बहुमत नव्हते. अध्यक्ष कोण होणार? त्यांना पाठिंबा कोण देणार? यावरून युरोपीय संघाचा प्राधान्यक्रम ठरणार आहे. 
 

 

युरोपीय संघाची संसद निवडणूक कशी असते? 
युरोपीय संघाची निवडणूक जगातील सर्वात मोठ्या निवडणुकींपैकी एक आहे. येथे एकाच वेळी २८ देशांतील ४१.८ कोटी मतदार ७५१ सदस्यांची निवड करतात. लोकसंख्येच्या दृष्टीने प्रत्येक सदस्य राष्ट्राला जागांचे वाटप करण्यात आले आहे. सदस्यांचा कार्यकाळ ५ वर्षे असतो. यंदा ५१ टक्के विक्रमी मतदान झाले. गत निवडणुकीच्या तुलनेतील हे प्रमाण ८ टक्के जास्त आहे. युरोपीय संसद भवन ब्रुसेल्स व स्ट्रॉसबर्गमध्ये आहे. 
 

सध्या एकूण ८ राजकीय पक्ष 
> सध्या आठ पक्ष, युरोपीय संघाच्या एकचतुर्थांश देशांतील २५ सदस्य सोबत आले तरच एक पक्ष तयार होतो. 
> एकूण ८ राजकीय पक्ष आहेत. सदस्यांना एका पक्षात सहभागी व्हावे लागते. अन्य लोक अपक्ष 
> २५ सदस्य जर २५ देशांच्या सोबत (अर्थात ७ देश) गेल्यास ते एक राजकीय पक्ष स्थापन करू शकतात. 
> शक्ती : युराेपीय संसद आराेग्य, पर्यावरण, काैटुंबिक समस्या, नाेकरी, वेतनाशी संबंधित मुद्द्यांवर निर्णय घेऊ शकते. 
> संसद अनेक विषयांवर प्रस्ताव मंजूर करू शकते, परंतु कायदा बनवू शकत नाही. त्यासाठी संसदेची सहमती आवश्यक असते. 
> संसद सदस्यांना युराेपीय बजेटला मंजुरीचा हक्कदेखील नाही. संसदेत अध्यक्षांच्या स्वाक्षरीनंतर ते लागू होते.

 

 

बातम्या आणखी आहेत...