आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लहान पण खूप आनंद देणारा व्यवसायही यशस्वी होऊ शकतो

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

वर्षानुवर्षे ग्वाल्हेरमध्ये खाण्याची प्रमुख तीनच ठिकाणे आहेत. ती स्नॅक्ससाठी प्रसिद्ध आहेत. त्यापैकीच एक बहादुरा स्वीट्स. कॅम्पनजीक नया बाजाराजवळ. हा शब्द इंग्रजी आर्मी कॅम्पकडून आला आहे. बुंदीच्या लाडवांसाठी प्रसिद्ध. हे लाडू दिवंगत पंतप्रधान अटलबिहारी वाजयपेयी यांच्या आवडीचे. त्या काळी ग्वाल्हेरहून त्यांना कोणी भेटायला आले तर ते विचारत, बहादुरातील माझ्या आवडीचे लाडू कुठे आहेत? वाजपेयी हेही ग्वाल्हेरचेच. त्यामुळे लाडू त्यांच्या परिचयाचे. एसएस कचोरीवाला त्याच भागातील आणखी एक ठिकाण. तेही स्नॅक्ससाठी प्रसिद्ध. तिसऱ्या जागेला विशिष्ट नावच नाही. आश्चर्य वाटले ना? या दुकानावर कोणताच बोर्ड नाही. पाटणकर चौकात हे दुकान आहे. शंभरी ओलांडलेले. आता तिसरी पिढी ते चालवत आहे. साधारणपणे त्याला 'पाटणकर चौक समोसेवाला' नावाने अोळखतात. या व्यवसायात मालकाने बक्कळ नफा कमावला. त्यामुळे व्यवसायातील प्रत्येक उपक्रमात ते सहभागी असतात. त्यांचे पूर्ण लक्ष गुणवत्ता आणि स्वादावर असते. या तिन्ही दुकानांत एक साम्य आहे. तुम्ही तेथे अगदी सहजरीत्या जाऊ शकत नाही. वाहन सहजसुलभपणे पार्क करता येत नाही. ऑर्डर दिल्यादिल्या कधीच हातात तो पदार्थ मिळत नाही. कारण तेथे नेहमीच भलीमोठी रांग ठरलेली. या तिन्ही दुकानांच्या यशाचे रहस्य म्हणजे पदार्थ स्टॉक करून ठेवला जात नाही. नेहमीच ताजा पदार्थ बनवून ग्राहकांना दिला जातो. आता तुम्ही विचारात पडला असाल की, एका दुकानाचा मालक इतका यशस्वी कसा? शेकडो लोकांना तो सेवा देतो. काही वेळ थांबा आणि जरा डस्टबिनकडे नजर टाका. त्यावरून लोकप्रियता कळेल. यातून आयकर अधिकाऱ्यांना काही मुद्दा मिळाल्यास मला दोष देऊ नका. या रविवारी शेफ संजीव कपूर यांच्या आग्रहास्तव मी सकाळी १० वाजता बहादुरा स्वीट्स येथे पोहोचलो. दुकान बंद करण्याची तयारी सुरू होती. मला आश्चर्य वाटले. कारण ही वेळ तर दुकान उघडण्याची. मग काय झाले? याचे कारण होते दुकानाची साफसफाई. दिवंगत संस्थापक बहादूरप्रसाद शर्मा आणि दुसऱ्या पिढीतील सर्वात मोठे भगवानशरण शर्मा रविवारी सकाळी ११ नंतर पूर्णवेळ दुकानाच्या साफसफाईसाठी देत.ग्राहकांची मोठी संख्या पाहूनही हा नियम कधीच मोडला नाही. प्रत्येक पदार्थाच्या डिलिव्हरीसाठी त्यांची वेळ ठरलेली आहे. त्यांचा दिवस सुरू होतो पहाटे ३ वाजता. त्यानंतर प्रत्येक पदार्थाची वेळ ठरते. जसे की कचोरी आणि जिलेबी फक्त सकाळीच मिळणार. हे कुटुंब खूप समाधानी आहे. दुसऱ्या ठिकाणी पदार्थांची विक्री करण्याची ऑफरही त्यांनी धुडकावली. व्यवसायाच्या विस्ताराबाबत मी सवाल केला. त्यांची अशी कोणतीही योजना नसल्याचे ऐकून आश्चर्य वाटले. त्यातील एकाने सांगितले, 'आमच्याकडे सर्वकाही आहे. आमच्यावर देवाची कृपा आहे.' त्यानंतर मला प्रश्न विचारला, 'व्यवसाय वाढवून रात्रीची झोप का खराब करायची?'

फंडा असा : छोटे आणि एकच दुकान असण्याचा अर्थ मालक यशस्वी नाही, असा कधीच होत नाही. ती व्यक्ती व्यवसायात किती प्रमाणात संतुष्ट आहे, यावर यश मोजावे लागते.
 

बातम्या आणखी आहेत...