आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सात दिवसांनंतरही 22 लाखांची चोेरी आणि महिलेचा खून करून लुटणारे गुन्हेगार पोलिसांच्या हाताबाहेर

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अमरावती - सात दिवसांपूर्वी नागपूरी गेट भागात घरात जाऊन गुन्हेगारांनी महिलेचा गळा दाबून सोन्याचे दागिने व रोख लंपास केली. तसेच दुसऱ्याच दिवशी राजापेठ ठाण्याच्या हद्दीत अडत्याच्या घरातून चोरट्यांनी तब्बल २२ लाखांच्या आसपास ऐवज लंपास केला आहे. विशेष म्हणजे दोन्ही घटनांमध्ये गुन्हेगारांनी मोबाइल चोरले नाहीत, त्यामुळे सात दिवस उलटूनही पोलिसांना तपासात तांत्रिक मदत झाली नाही. अशावेळी वीस ते पंचवीस वर्षांपूर्वी ज्या पद्धतीने पोलिस आरोपींना खबऱ्यांच्या माध्यमातून गाठायचे, ती पद्धत उपयुक्त ठरली असती मात्र दोन्ही प्रकरणातील पोलिसांची आतापर्यंतची प्रगती केवळ तांत्रिक मुद्द्यावरच अवलंबून असल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे या प्रगत तंत्रज्ञानाच्या काळात पोलिसांची खबऱ्या पद्धती लोप पावली का? अशी चर्चा सर्वसामान्य नागरिकांमध्ये सुरू आहे.

 

शहरातून पोलिसांचा दरारा संपल्याचे सांगत या दोन्ही घटनांमुळे अख्खे अमरावती शहर चोरट्यांच्या दहशतीत आले आहे. घटना होवू नयेत, यासाठी पोलिसांकडून योग्य उपाययोजना करणे अपेक्षित आहे मात्र, या दोन्ही घटना घडण्याच्या काही दिवसांपूर्वीपासून शहरात प्रभावी पोलिसिंग दिसत नव्हती, त्याच संधीचा फायदा चोरट्यांनी घेऊन एक नव्हे दोन मोठ्या घटना केल्या आणि पोलिसांचे डोळे उघडले. या दोन घटनेनंतर पोलिस खळबडून जागे झाले आणि घटना होण्यापूर्वी गंभीरपणे न होणाऱ्या रात्रीच्या गस्तीसाठी वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांपासून शिपायांपर्यंत सर्वच रस्त्यावर उतरले. त्यानंतर मात्र शहरात कोणतीही मोठी चोरी झाली नाही.

दुसरीकडे गाडगेनगर ठाण्याच्या हद्दीतील खून व लूटमार प्रकरण आणि राजापेठच्या हद्दीतील २२ लाखांच्या चोरीचा तपास पेालिसांनी सुरू केला. आज सात दिवस उलटले मात्र संशयितांच्या चौकशीशिवाय दोन्ही प्रकरणात पोलिसांची प्रगती नाही. पोलिसांना अद्याप चोरट्यांचा सुगावा न लागण्याचे सर्वात मोठे कारण दोन्ही गुन्ह्यात आरोेपींनी मोबाइल चोरलेले नाहीत. कारण यापूर्वीच्या अनेक प्रकरणात पोलिस केवळ मोबाइलच्या आधारे गुन्हेगारांपर्यंत पोहोचले आहेत. मात्र गुन्हेगार आता सजग झाले आहेत. ते मोबाइलची चोरी करत नाही किंवा केली तरी काळजी घेतात, जेणेकरून पोलिसांना मदत होऊ नये. त्यामुळे पोलिस अजूनही हवेत हात मारत आहेत. पंचवीस वर्षांपूर्वी मोबाइल वापर अंत्यत कमी होता, त्यावेळीसुद्धा असे गुन्हे घडायचे मात्र गुन्हेगारांची माहिती देण्यासाठी पोलिसांजवळ त्याच ताकदीचे खबरे राहायचे, आणि त्याच आधारे पोलिस गुन्हेगारांचे मुसक्या आवळत होते. आता मात्र खबरे आहे की नाही, याबाबत शंका आहे. वास्तविकता खबरे जपण्याची जबाबदारी ठाण्यातील डी बी पोलिस पथक व गुन्हे शाखेची आहे मात्र या दोन्ही गुन्ह्यामध्ये मोबाइलची मदत होत नसल्यामुळे पोलिस केवळ 'प्रयत्न' करत आहे. सात दिवसांनतरही दोन्ही मोठ्या प्रकरणात पोलिसांना यश न येणे हे पोलिसांची खबऱ्या पद्धती पूर्णत: कमकुवत असल्याचे दाखवून देत आहेत.

 

गुन्हे शाखेची आहे जबाबदारी सर्वाधिक
शहरातील गुन्हेगारी नियंत्रणात ठेवणे, गुन्हे होऊ नयेत, यासाठी उपाययोजना करणे, गुन्हे घडल्यास ते उघड करण्याची सर्वाधिक जबाबदारी गुन्हे शाखेची आहे मात्र या दोन गुन्ह्यात अजूनही गुन्हे शाखेला गुन्हेगारांची दिशासुद्धा मिळाली नाही. ठाण्यातील पोलिसांना गुन्हेगारांंच्या शोधासोबतच इतरही भरपूर कामे करावी लागतात मात्र गुन्हे शाखेतील अधिकारी, कर्मचाऱ्यांना गुन्हेगारांच्या शोधा व्यतिरिक्त इतर कामे अंत्यत कमी राहतात, काही महिन्यांपासूून गुन्हे शाखेची कामगिरी अतिशय असमाधानकारक आहे मात्र तरीही गुन्हे शाखेत अनेक अधिकारी, कर्मचारी वर्षानुवर्षांपासून कायम आहेत, काही अधिकारी, कर्मचारी बदलीनंतर पुन्हा त्याच ठिकाणी येतात, यावरून गुन्हे शाखेत काय सुरू आहे, याकडे पोलिस आयुक्तांनी लक्ष देणे आवश्यक झाले आहे. 

बातम्या आणखी आहेत...