आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

टीव्ही अभिनेत्री सिमरन खन्नाच्या फिटनेसने प्रभावित झाली होती डॉक्टर, मागितला होता डाएट प्लॅन 

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

टीव्ही डेस्क : उत्तम आयुष्य जगण्यासाठी हेल्दी राहाणे आणि तब्येतीविषयी सतर्क राहाणे गरजेचे आहे. सिमरन खन्ना एवढी फिट आहे की, लोक तर लोक मात्र डॉक्टरदेखील तिला डाएट टिप्स मागतात. अशातच सिमरन जाहिरातीचे शूटिंग करत होती, ज्यामध्ये 5 डॉक्टरदेखील तिच्यासोबत शूटिंग करत होते.  शूटिंगचा ब्रेक झाल्यानंतर त्यातील काही डॉक्टर तिच्याकडे आले आणि तिला डाएट टिप्स विचारू लागले. 

दैनिक भास्करसोबत बोलताना सिमरनने सांगितले, "मला असे वाटते जी व्यक्ती आपल्या शरीराने धनवान आहे म्हणजेच हेल्दी आहे तोच खरा धनवान आहे. मी खूप जास्त डाएट करत नाही. केवळ एवढे लक्ष ठेवते की, जे खात आहे, ते योग्यच खात आहे. माझे खूप फ्रेंड्स आहेत, जे खूप वर्षांनंतर भेटतात आणि म्हणतात की, तू अजूनही जशीच्या तशीच दिसते. माझे मानणे आहे की, आपण ज्या भागातील असतो त्या भागीतील खाणे आपल्या शरीरासाठी योग्य असते. जसे मी पंजाबी कुटुंबातील आहे तर जितके शक्य होईल मी पंजाबी पदार्थ खाणे पसंत करते. 

सिमरनने पुढे सांगितले, 'आजकाल कीटो डाएट खूप सुरु आहे, मी त्याच्या पूर्णपणे विरोधात आहे. घरचे जेवण जेव्हा, भुकेपेक्षा जास्त खाऊ नका, आणि रोज थोडी एक्सरसाइज करणे गरजेचे आहे. सर्वजण मला डाएट टिप्स विचारत असतात, हद्द तर तेव्हा झाली जेव्हा एका जाहिरातीचे शूटिंग करत होते तेव्हा त्यांपैकी काही डॉक्टर मला डाएट टिप्स विचारू लागले. 

सिमरन म्हणाली, 'मला खूप विचित्र वाटले की, साधारणतः लोक डॉक्टरला डाएट प्लॅन मागतात. पण ते म्हणाले की, आम्ही तुला 10 वर्षांपूर्वी पाहिले होते आणि आता पाहात आहोत. तू अजिबात बदलली नाही. कधी कधी वाटते मी डाएट टिप्स देणारी सल्लागार बनले आहे. सिमरन सीरियल 'ये रिश्ता क्या कहलाता है' मध्ये गायु ही भूमिका साकारत आहे.