आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

देव देखील बदलू शकत नाही इन्फोसिसचे आकडे : निलेकणी

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • आयटी कंपनीच्या अध्यक्षांचे व्हिसलब्लोअर्सला उत्तर
  • व्हिसलब्लोअरचे सर्व आरोप निराधार, निलेकणी म्हणाले

​​​​​​बंगळुरु : इन्फोसिसचे अध्यक्ष नंदन निलेकणी यांनी व्हिसलब्लाेअर समुहाने केलेल्या आराेेपांना उत्तर दिले आहे. ते म्हणाले, देवही कंपनीच्या आकडेवारीत फेरबदल करू शकत नाही. अज्ञात कर्मचाऱ्यांच्या (व्हिसलब्लोअर) एका समुहाने केलेले आराेप पूर्णत: निराधार आहेत. हे एक खाेडकर बंड आहे. असे आराेप करण्याचा उद्देश केवळ काही मान्यवर व मेहनती लाेकांना बदनाम करण्याचा आहे. आमचे सहसंस्थापकांनी कंपनीसाठी सर्वस्व अर्पण केले आणि आम्ही त्याचा सन्मान करताे.त्यांनी नेहमी नि:स्वार्थ भावनेतून कंपनीची सेवा केली. आजही कंपनीच्या यशस्वीतेसाठी कटीबध्द आहेत. कंपनीने आराेपांचा तपास करण्यासाठी शार्दुल अमरचंद मंगलदास या बाहेरच्या कायदा कंपनी हायर केली असल्याचे निलेकणी यांनी स्पष्ट केले. या अगाेदर ३१ ऑक्टाेेबरला व्हिसलब्लाेअर्सने इन्फाेसिसचे सीइओ सलिल पारेख व सीएफअाे निलांजन राॅय यांच्यावर कंपनीचा महसूल व नफा वाढवून दाखवण्यासाठी अकाऊंटिंगमध्ये गैरप्रकार करत असल्याचा अाराेप केला हाेता. त्यांनी इन्फाेसिसचे संचालक मंडळ अाणि युएस सिक्युरटी एक्सचेंज कमिशन (एसईसी) यांना लिहिलेल्या पत्रात सीईओ सलिल पारेख यांना लक्ष्य केले हाेते. पारेख फायनान्स टीमवर आकड्यात फेरफार करण्याचा दबाव राहिल, रेव्हेन्यू रिकाॅग्निशन अकाऊंटिंग स्टॅंडर्ड प्रमाणे नाही असे पत्रात लिहिले आहे. या पत्रानुसार बहुतांश व्यवहारात अनियिमतता आहे. सीईओ पारेख यांच्याकडून रिव्ह्यु आणि अप्रुव्हलकडे लक्ष दिले जात नाही. सेल्स डिपार्टमेंटला मंजुरीसाठी मेल न पाठवण्याचे आदेश देण्यात आले असल्याचा आराेप पत्रात केला आहे.

निलेकणींच्या विधानानंतर शेअर्समध्ये २.३७ % वाढ
नंदन नीलेकणीयांच्या विधानानंतर बीएसईमध्ये बुधवारी इन्फोसिसचा शेअर्स १६.५० रुपयांनी वाढून ७१२.३० रुपयांच्या किंमतीवर बंद झाला. या अाधी २२ ऑक्टाेबरला कंपनीचा शेअर १६.२१ रुपयांनी घसरून ६४३.३० रुपयांवर बंद झाला हाेता. २१ ऑक्टाेबरला विधानसभा निवडणुकीमुळे शेअर बाजाराचे कामकाज बंद हाेते.
 

बातम्या आणखी आहेत...