आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रात की गोद में शाम पड़ी है, दरिया लिपटा हुआ है पीपल से...

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवनीत गुर्जर

कडाक्याचा गारठा अाहे. सूर्यदेखील घाबरताे अाहे. कधी ताे ढगांचा घंुघट अाेढून घेताे, तर कधी धुक्याची दुलई पांघरूण झाेपून राहताे. जागादेखील हाेताे तेव्हा वाटते की, ढगांच्या बाकावर बसून एखाद्या अाठवणीप्रमाणे व्यापून राहिलेल्या नैराश्येचे उसासे टाकत असावा. अधिक भावुक हाेताे तेव्हा अासवेही अाेघळतात. अाम्ही त्याला दव म्हणताे. पिकांसाठी चांगले अाणि वाईटही. म्हणजे गव्हासाठी ते चांगले अाणि हरभरा असेल तर सूर्याची ही अासवे थेट शेतकऱ्यांच्या डाेळ्यात दिसू लागतात. थंडीची नानाविध रूपं अाहेत तसे प्रत्येक विभागात थंडीचा निराळा प्रभावही. कुठे रात्रीच्या कुशीत सायंकाळ कुढत असते, कुठे पिंपळाला लपेटलेला सागर जाेरजाेराने गर्जत अाहे अन् कुठे डाेंगराच्या छाताडावर काेवळे गवत अंकुरले अाहे. हे! थंडी तू कशी निर्माण झालीस. तुझी दृष्टी चक्क शुभ्र. राक्षसी अाणि देवमयही. तुझ्या नजरेत पहाट अाणि सायंकाळही. तुझा सुगंध जणू सायं वादळ. तुझे अाेठ जणू कारल्याच्या रसाचे घाेट. तू एका हाताने अानंदाचे राेपण करतेस तर दुसऱ्या हाताने विध्वंस.

जसे स्वप्न गाेठून जातात तसे पानांवर दवांचे थेंब गाेठत अाहेत. काही राज्यांतील शिवारामध्ये सळसळणाऱ्या पिकांच्या रांगेतील 'नाे मेन्यू लँड' बर्फाच्छादित झाला अाहे. शेतकरी या रांगेतील गवताला ना हात लावू शकताे, ना ती उपटून काढू शकताे. थंंडीच्या दिवसांत दाेन-दाेन अाकाश पाहायला मिळतात, कधी खरे तर कधी धुके दाटलेले अाकाश. धुके दाटलेले अाकाश लाेकांच्या जिवावर उठले अाहे. विशेषत: दिल्ली, हरियाणा, पंजाबमध्ये. दादा लाेक तरीही एेकत नाहीत. १०० पेक्षा कमी वेगाने वाहन चालवायला काेणी तयारच नाही. उत्तर प्रदेश थंडीने कुडकुडत अाहे, जसे काही अांदाेलनामुळे झालेल्या नुकसानीचा हिशेब याेगीजी अचानक अालेेल्या थंडीकडून वसूल करणार अाहेत. एक मात्र खरे की, थंडी कमालीची वाढली अाहे अाणि विराेधकांसमाेर साऱ्या शस्त्रांनिशी उभे राहणाऱ्या केंद्र सरकारने घाेंगडी पांघरली अाहे. रस्त्यावर उतरलेला विराेधी पक्ष अाता घरात दडला अाहे, जशी दातांमध्ये जीभ असते.

दिल्लीत थंडी अाहे, परंतु केजरीवाल यांनी पांघरलेली कांबळ काढून ठेवली अाहे. ते सतत लाेकांसाठी काम करीत अाहेत. यावर्षीच निवडणुका हाेत अाहेत अाणि भाजप किंवा काँग्रेसची अाता तशी स्थिती नाही, जशी पाच वर्षांपूर्वी हाेती. दिल्लीकर अाता 'अाप'भराेसे खुश अाहेत. असाे, साेडून द्या या राजकीय गाेष्टी, कडाक्याच्या थंडीतही गार पाण्याने स्नान करणाऱ्यांना विचारा त्यांना काय वाटते. ते म्हणतील,


हे ठंड! तुम्हारे गहनों की छटा कितनी भयानक!
तुम्हारा आलिंगन!
जैसे कोई कब्र में उतरता ज
ाए!!

नवनीत गुर्जर, नॅशनल एडिटर, दैनिक भास्कर
 

बातम्या आणखी आहेत...