Home | International | Other Country | Event horizon telescope team issues first ever real photo of super massive black hole

अखेर जारी करण्यात आला ब्रह्मांडातील अदम्य शक्ती सुपरमॅसिव्ह Black Hole चा खराखुरा PHOTO

दिव्य मराठी वेब टीम | Update - Apr 11, 2019, 11:14 AM IST

जाणून घ्या जेथे फिजिक्सचे नियम लागू होत नाहीत त्या ब्लॅक होलबद्दल...

 • Event horizon telescope team issues first ever real photo of super massive black hole

  न्यूज डेस्क - ब्रह्मांडातील सर्वात शक्तीशाली दानव म्हणून कुप्रसिद्ध असलेला सुपरमॅसिव्ह ब्लॅक होल ब्रह्मांडाच्या मध्यभागी सापडला आहे. त्याचाच पहिला खरा फोटो समोर आला आहे. आजपर्यंत ब्लॅक होलचे (कृष्ण विवर) जे काही फोटो इंटरनेट आणि पुस्तकांमध्ये उपलब्ध आहेत ते केवळ काल्पनिक होते. परंतु, आता संशोधकांनी पहिल्यांदाच 6 ठिकाणी पत्रकार परिषदा घेऊन या दानवाचा खरा फोटो जारी केला. भारतीय वेळेनुसार, रात्री उशीरा इव्हेंट होरायझन नावाच्या टेलिस्कोपने टिपलेला फोटो जारी करण्यात आला आहे.

  असा टिपला ऐतिहासिक फोटो...
  ब्लॅक होल अंतराळातील आणि एकूण ब्रम्हांडातील सर्वात शक्तीशाली घटक आहे. त्याचे छायाचित्र सुद्धा अद्याप घेण्यात आलेले नव्हते. तेच आता युरोपियन अंतराळ संशोधन संस्थेच्या वैज्ञानिकांनी टिपल्याचा दावा केला आहे. यासाठी इव्हेंट होरायझन टेलिस्कोप जगभरातील 6 ठिकाणी लावण्यात आले. हा टेलिस्कोप प्रामुख्याने ब्लॅक होलचे छायाचित्र टिपण्यासाठी बनवण्यात आले आहे. ते सध्या हवाई, अमेरिकेतील अॅरिझोना प्रांत, स्पेन, मेक्सिको, चिली आणि दक्षिण ध्रुवात लावण्यात आले आहेत. हे सर्वच टेलिस्कोप एकमेकांशी कनेक्टेड असून त्यांना एका शक्तीशाली आणि आभासी टेलिस्कोपचे स्वरुप देण्यात आले आहे. या टेलिस्कोपचे नियंत्रण एका सुपर कॉम्प्युटरने केले जात आहे.


  ब्लॅक होल म्हणजे काय?
  > युरोपियन अंतराळ संशोधन संस्थेचे ब्लॅक होल तज्ज्ञ पॉल मॅक्नमारा यांनी सांगितल्याप्रमाणे, ''गेल्या 5 दशकांपेक्षा अधिक वर्षांपासून संशोधक आकाशगंगेतील केंद्रात काही तरी अत्यंत चमकदार असल्याचे पाहत आहेत.'' तीच गोष्ट नेमकी काय आहे हे लवकरच साऱ्या जगासमोर येणार आहे. ब्लॅक होल मुळात एक खगोलीय शक्तीच आहे. तारे अर्थात सूर्य नष्ट झाल्यानंतर अंतराळात फक्त एक गुरुत्वाकर्षणाचा बिंदू शिल्लक राहतो. या बिंदूची ताकद नंतर इतकी वाढत जाते की आपल्या वाटेत येणारी प्रत्येक गोष्ट गिळंकृत असते. तीही अशी की गिळंकृत केल्या जाणाऱ्या गोष्टीचा, ग्रह, तारे, धूमकेतूंचा नामोल्लेखही राहत नाही. त्यालाच ब्लॅक होल असे म्हटले जाते.
  > ब्लॅकहोलमध्ये गुरुत्वाकर्षणाची इतकी ताकद आहे की यात प्रवेश केल्यानंतर प्रकाश सुद्धा परावर्तित होत नाही. अर्थात ब्लॅकहोलमध्ये गिळंकृत होताना ग्रह, तारे आणि प्रकाशाची गती ही प्रकाशापेक्षाही अधिक असते. या ब्लॅक होलचे गुरुत्वाकर्षण इतके शक्तीशाली असते की तेथे टाईम आणि स्पेस सुद्धा मोडले जातात. फिजिक्सचे नियम तेथे लागू होत नाहीत. याच ब्लॅकहोलवरून अॅल्बर्ट आइनस्टाईन यांच्यासह इतर प्रसिद्ध शास्त्रज्ञांनी लूप होल, व्हाइट होल आणि टाईम ट्रॅव्हेलच्या संकल्पना सुद्धा मांडल्या आहेत. एखादी व्यक्ती प्रकाशापेक्षा अधिक गतीने प्रवास करत असल्यास ती टाईम ट्रॅव्हेल करू शकते असा त्यांचा तर्क आहे.

Trending