आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराइंदूर - येथील एका इव्हेंट मॅनेजर तरुणीला प्रॉपर्टी ब्रोकरने 6 तास कारमध्ये वेठीस धरुन तिच्यावर अतिप्रसंग केला. सोबतच कारच्या सीट बेल्टने त्या तरुणीला बेदम मारहाण केली. धावत्या कारमध्ये अत्याचार सुरू असताना तरुणीला पोलिस व्हॅन दिसली. तिने वेळीच ओरडून मदत मागितली. तरीही पोलिस त्या वाहनाला पकडू शकले नाही. पीडित तरुणी कशी-बशी पोलिस स्टेशनला पोहोचली. परंतु, पोलिसांनी तिच्याकडून रेपची तक्रार दाखल करण्यास नकार दिला. तसेच फक्त मारहाणीची तक्रार दाखल करून तिला परत पाठवले.
काय म्हणाली तरुणी...
यानंतर तरुणीने मेडिकल कॉलेज आणि रुग्णालयात धाव घेत आपली मेडिकल टेस्ट केली आणि स्वतःच लसूडिया पोलिस ठाण्यात जाऊन बलात्काराचा गुन्हा दाखल केला. तरुणीने सांगितल्याप्रमाणे, ती एक इव्हेंट मॅनेजर आहे. त्यामुळे, ती विशाल भोजवानी नावाच्या प्रॉपर्टी डीलरच्या संपर्कात आली. काही दिवसांनंतर विशालने तिला संबंध बनवण्यासाठी दबाव टाकला. परंतु, तिने यास स्पष्ट नकार दिला. शनिवारी रात्री साडे 9 च्या सुमारास आरोपी विशालने तिला बळजबरी कारमध्ये बसवले आणि तिची छेड काढण्यास सुरुवात केली. विरोध केला तेव्हा कारच्या सीट बेल्टने मारहाण केली. या दरम्यान इंदूर बायुपासजवळ तिला पीसीआर व्हॅन दिसली. तिने आवाजही दिला आणि पोलिसांनी पाठलागही केला. परंतु, तो पोलिसांना चकवा देऊन तिला आपल्या नरीमन पॉइंट येथील फ्लॅटपर्यंत घेऊन आला. पहाटे 4 वाजता ती फ्लॅटमधून पसार होऊन पोलिस स्टेशनला पोहोचली. त्या ठिकाणी एक पुरुष आणि दोन महिला पोलिस होत्या. त्यांनी आपल्याकडे फक्त हुंडाबळीची तक्रार घेतली जाते असे सांगितले. यानंतर फक्त मारहाणीचा गुन्हा दाखल केला.
पोलिसांची कहाणी...
पोलिस अधिकारी दूधी यांनी सांगितल्याप्रमाणे, विशालच्या विरोधात मारहाण आणि बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीने तिला मारहाण केल्याचे खुणा तिच्या शरीरावर दिसून आल्या आहेत. प्राथमिक चौकशीनुसार, त्या दोघांमध्ये आधीपासूनच चांगली मैत्री होते असे कळाले आहे. हे दोघे शनिवारी रात्री एका पार्टीला गेले होते. त्याच पार्टीत वाद झाला आणि कारमध्ये तरुणीसोबत हा प्रकार घडला. आरोपी विशालला त्याच्या फ्लॅटमधून अटक करण्यात आली आहे. तरुणी सुरुवातीला पोलिस ठाण्यात आली त्याची माहिती आपल्याला मिळालीच नाही असा दावा संबंधित अधिकाऱ्याने केला. सोबतच, स्टाफची काही चूक आढळून आल्यास त्यांच्यावर सुद्धा कारवाई केली जाईल असे वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.