आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Everve EF1 Electric Scooter Prototype Breaks Cover Showcase At Auto Expo 2020

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

पुण्यातील ईवर्वने सादर केली लग्जरी स्कुटर, 100 किमीची असणार रेंज; बूस्ट बटनचा ओव्हरटेक करण्यासाठी उपयोग

एका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • फास्ट चार्जने 1 तासात फुल चार्ज, 110 किलोमीटर प्रति तासाची टॉप स्पीड
  • पुढील अपग्रेड प्रकारामध्ये एनएफसी आणि ब्लूटूथ कनेक्टिव्हिटीसह डिजिटल कन्सोल

नरेंद्र जिझोतिया

ऑटो डेस्क - ऑटो एक्सपो 2020 मध्ये पुण्यातील ईवर्व वेहिकल मॉडिफिकेशन कंपनीने सहभाग नोंदवला आहे. या कंपनीने स्वतःच्या उत्पादनासोबत इलेक्ट्रिक स्कूटरच्या सेगमेंटमध्ये एंट्री करत आहे. कंपनीने आपले पहिले प्रोटोटाइप मॉडल EF1 सादर केले. लग्जरी लुक असणाऱ्या या स्कूटरला वर्षाच्या अखेरिस लॉन्च करण्यात येईल. त्याचवेळी या स्कूटरची किंमत समोर येणार आहे. ईवर्वचे मॅनेजिंग डायरेक्टर श्रीनिवासयांनी या स्कूटरविषयी अनेक माहिती सामायिक केली. 

100 किलोमीटरपर्यंत चालू शकते


या स्कूटरमध्ये दोन रिमूव्हेबर बॅटरीचा वापर करण्यात आला आहे. दोन्ही बॅटरी बाहेर काढून चार्ज करता येतील. फास्ट चार्जद्वारे एका तासात आणि रेग्युलर चार्जने 5 तासांत ही बॅटरी चार्ज होते. ही स्कूटर फुल चार्जमध्ये 100 किलोमीटरपर्यंत धावू शकते. तर यात 110 किलोमीटर प्रति तास टॉप स्पीड देण्यात आली आहे. 

4 ड्रायव्हिंग मोड 

स्कूटरमध्ये 4 ड्रायव्हिंग मोड देण्यात आले आहे. यामध्ये M1, M2, टर्बो बूस्ट आणि S चा समावेश आहे. ही स्कूटर महामार्गावर चालवण्यासाठी स्पोर्ट मोडचा उपयोग करू शकता. जर समोरच्या गाडीला ओव्हरटेक करायचे असेल तर टर्बो बूस्टचा वापर करता येतो.  

कलर स्क्रीन असलेला कन्सोल

या स्कूटरमध्ये कलर स्क्रीन असलेला कन्सोल देण्यात आला आहे. हे अॅपद्वारे कनेक्ट करता येतो. यामध्ये बॅटरी चार्जिंग, स्पीड, ट्रिप मीटर, बूस्ट लेव्हल यांसाह इतर माहिती दिसते. कंपनी स्कूटरच्या नवीन व्हेरिएंटमध्ये डिजिटल कन्सोल लावणार आहे. ज्यात NFC आणि ब्लूटूथ कनेक्टिव्हिटी सोबत जीपीएस नेव्हिगेशन दिले जाणार आहे. 

स्कूटरवर कंपनीच्या लोगोचा अनेक ठिकाणी वापर 


ईवर्वने या इलेक्ट्रिक स्कूटरवर कंपनीच्या लोगोचा अनेक ठिकाणी वापर केला आहे. उदाहर्णार्थ फ्रंटमध्ये LED लाइटला लोगो सारखी डिझाइन केले आहे. याच्या चावीत देखील लोगोच्या डिझाइनचा वापर करण्यात आला आहे. स्कूटरच्या फ्रंटमध्ये गोलाकार LED लाइट दिली आहे. तर बॅक साइडला आयर्न मॅन सारख्या डिझाइनची लाइट दिली आहे. 

EF1 चे इतर फीचर्स

स्कूटरच्या मागे आणि पुढे 12-इंचचे व्हील्स देण्यात आले आहे. सुरक्षेसाठी दोन्ही चाकांमध्ये डिस्क ब्रेक मिळणार आहे. समोरील बाजूस स्पीकर आणि एक बॉटल होल्डर दिले आहे. सीटच्या खाली बॅटरीसोबत सामान ठेवण्यासाठी जागा देण्यात आली आहे. ही स्कूटर 6 रंगात लॉन्च केली जाणार आहे.