Home | National | Other State | Every 16 minutes a plane is landed, 940 chartered planes for 1500 VIPs in Ambani-piramil weddings

दर 16 मिनिटांनी लँड हाेते एक विमान, 1500 व्हीआयपी पाहुण्यांच्या सेवेसाठी 92 चार्टर्ड प्लेन

दिव्य मराठी | Update - Dec 08, 2018, 03:16 PM IST

अंबानी-पिरामल परिवारातर्फे नारायण सेवा संस्थानमध्ये दिव्यांगांना स्नेहभाेजन

  • Every 16 minutes a plane is landed, 940 chartered planes for 1500 VIPs in Ambani-piramil weddings

    उदयपूर - प्रसिद्ध उद्याेगपती मुकेश अंबानी यांची कन्या ईशा अंबानी हिची दाेनदिवसीय प्री-वेडिंग सेरेमनी शनिवारपासून सुरू हाेत आहे. यात सहभागी हाेण्यासाठी देश-विदेशातील पाहुणे उदयपूरला येत आहेत. येथील डबाेक एअरपाेर्टवर शुक्रवार सकाळपासून ते रात्रीपर्यंत एकूण ९० विमाने उतरली. यात ५० चार्टर्ड प्लेन व ४० नियमित फ्लाइट्स हाेती. म्हणजे दर १६ मिनिटाला एक विमान उतरले. शनिवारी व रविवारी पाहुण्यांचा राबता सुरू राहील.

    याचदरम्यान एअरपाेर्टवर हाॅलीवूड सिंगर बियाेंसे नाेल्सचा चमूही दिसला. बियाेंसे यांचा कार्यक्रम या उत्सवात हाेण्याची शक्यता आहे. या साेहळ्यात सहभागी हाेण्यासाठी १८०० व्हीआयपी पाहुण्यांना निमंत्रण दिले आहे. यापैकी १५०० पाहुणे चार्टर्ड प्लेनने येत आहेत, इतर नियमित विमानांनी. पाहुण्यांना उदयपूरमध्ये आणण्यासाठी खासगी कंपन्यांची ९२ चार्टर्ड विमाने भाड्याने घेतली आहेत. मुकेश अंबानी व आनंद पिरामल यांचे कुटुंबीय शुक्रवारी सायंकाळी नारायण सेवा संस्थानमध्ये गेले हाेते. तेथील दिव्यांग मुलांना त्यांनी सस्नेहभाेजन दिले. निमंत्रण पत्रिकेनुसार शनिवारी तीन कार्यक्रम हाेतील. सायंकाळी ५ वाजता महाआरती हाेईल. यानंतर डिनर व संगीत रजनीचा कार्यक्रम हाेईल. रविवारी ट्रायडेंट लाॅन्समध्ये अंबानी परिवारातर्फे स्वदेश बाजार लावला जाईल. यात देशातील वेगवेगळ्या राज्यांचे हातमाग व टेक्सटाइल्सच्या उत्पादनांची १०८ केंद्रे उभारली जातील.

    शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेही सहकुटुंब या साेहळ्यासाठी आले आहेत. अमेरिकेतून हिलरी क्लिंटन, वेदांता ग्रुपचे चेअरमन अनिल अग्रवाल, सलमान खान, करण जाेहर, अक्षय कुमार, अनिल कपूर, अरजित सिंह, वरुण धवन शनिवारी येणार आहेत. रविवारच्या कार्यक्रमासाठी उद्याेगपती रतन टाटा, गाैतम अदानी, कुमारमंगलम बिर्ला आणि अमिताभ बच्चन येतील. मुख्य कार्यक्रमास पंतप्रधान नरेंद्र माेदी यांचीही उपस्थिती असू शकेल.

Trending