आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सोशल मीडियासाठी भाजपचा दरदिवशी एक अजेंडा; भाजपच्या 'थिंक टँक'ची सरकारच्या बाजूने वातावरणनिर्मिती

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली- भारतीय जनता पक्षाने २०१९ च्या निवडणुकीसाठी प्रचाराचे रणशिंग फुंकले. पक्षाच्या वतीने सोशल मीडियावर दररोज एक मुद्दा समोर आणला जात आहे. आगामी निवडणुकीच्या चर्चेतील मुद्द्यांची दिशा निश्चित करण्याच्या कामाला सुरुवातही करण्यात आली. नुकतेच स्तंभलेखिका शेफाली वैद्य यांनी टि्वटरवर एक संदेश शेअर केला. यात त्या म्हणतात, '२०१९ मध्ये केवळ एक निवडणूक होत नसून ही सभ्यतेची लढाई आहे. आपण कुठल्या बाजूला आहोत, हे तुम्हीच ठरवा. तटस्थ राहण्याची ही वेळ नाही तर आपल्या जनरलवर (मोदींकडे इशारा) विश्वास ठेवायला हवा.' शेफाली यांचा हा संदेश भाजपच्या प्रचार धोरणाचाच एक भाग असल्याचे म्हटले जाते. चर्चित मुद्द्यांची दिशा ठरवण्यासाठी तीन मॅरेथॉन बैठका घेण्यात आल्या. दोन बैठका दिल्लीतील इंदिरा गांधी राष्ट्रीय कला केंद्रात आणि एक बैठक इंडिया फाउंडेशनच्या बॅनरखाली तीनमूर्ती भवनमध्ये झाली. बैठकीला भाजप-संघ विचारांशी जोडले गेलेले लेखक, सोशल मीडियातील प्रभावी चेहरे, हितचिंतक, स्तंभलेखक आणि प्रसारमाध्यमांशी संबंधित ६० लोकांचा समावेश होता. बैठकीमध्ये स्मृती इराणी, माहिती व प्रसारण मंत्री राज्यवर्धनसिंह राठोड, नीती आयोगाचे उपाध्यक्ष राजीव कुमार, इंदिरा गांधी कला केंद्राचे संचालक रामबहादूर राय, कला केंद्राचे सदस्य सचिव डॉ. सच्चिदानंद जोशी, माय-गव्हर्नचे माजी संचालक अखिलेश मिश्रा यांचा सहभाग होता. 


त्यांच्याव्यतिरिक्त पंतप्रधान कार्यालयातील २ अधिकारी, ओएसडी तसेच पडद्यामागे राहून पंतप्रधान मोदींसाठी सोशल मीडियाचे धोरण ठरवणारे डॉ. हिरेन जोशी आणि संशोधन अधिकारी यश गांधी यांचीही या वेळी उपस्थिती होती. 

 

सूत्रांच्या मते, २०१९ च्या निवडणुकीत कुठल्या मुद्द्यांना महत्त्व द्यायचे हे सरळ पंतप्रधान कार्यालयातून ठरत आहे. मोदी सरकारच्या बाजूने मत तयार करण्यासाठी चर्चेचे वातावरण तयार करण्यासाठी थिंक टँक बनवली जात आहे. त्यांच्या माध्यमातून विविध मुद्द्यांवर दररोज धोरण ठरवून सोशल मीडियाचा अजेंडा निश्चित केला जात आहे. नवीन आशय कशा पद्धतीने तयार केला जाईल? विरोधकांबद्दल काय मत व्यक्त करायचे? यासाठी कुठल्या शब्दांची निवड करायची आदींची जबाबदारी थिंक टँकवर आहे. सोशल मीडियासह पंतप्रधान कार्यालयाला आवश्यक इनपुट कसे द्यायचे? पुस्तके कोणती आणि लेख कसे लिहायचे? याबद्दलची योजनाही थिंक टँक बनवत आहे. यासाठी बैठकीला उपस्थित असलेल्या लोकांचा आणि लेखकांचा एक व्हॉट्सअॅप ग्रुप बनवण्यात आला आहे. या ग्रुपवर दररोज अजेंड्यावर चर्चा होते. संघ विचारांशी निगडित रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनी, श्यामाप्रसाद मुखर्जी फाउंडेशन, इंडिया फाउंडेशनसारख्या थिंक टँकनाही मोदी सरकारच्या बाजूने वातावरणनिर्मिती करण्यासाठी निर्देश देण्यात आले आहेत.

 

सकारात्मक चर्चेच्या माध्यमातून भाजपच्या बाजूने वातावरणनिर्मिती करण्यासाठी महासचिव राम माधव यांचे “थिंक टँक इंडिया फाउंडेशन’ही सक्रिय झाले आहे. मोदी सरकारला फायदा व्हावा म्हणून स्वच्छतेला बाल आंदोलन करण्याचा सल्ला देण्यात आला. यावर मानव विकास मंत्रालयाला प्रस्ताव देण्यात आला. त्यानुसार २ ऑक्टोबर दरम्यान तीन दिवस देशभरात मुलांना स्वच्छता अभियानाशी जोडण्यात यावे. शालेय विद्यार्थीच आता स्वच्छतेचे आवाहन करतील. कला केंद्राचे सदस्य सचिव जोशी यांनी मात्र बैठकांना निवडणूक किंवा राजकारणाशी जोडले जाऊ नये, असे वाटते. ते म्हणाले की, “भारतातील विविध मुद्द्यांना अनुसरून सोशल मीडियावर जी चर्चा हाेते त्यात सकारात्मक पद्धतीने आपले म्हणणे कसे मांडायचे, धर्म, जात आणि भाषेसंदर्भात सकारात्मक वातावरण कसे बनवायचे आणि समाजात सकारात्मकता वाढीस लागण्यासाठी काय करायला हवे आदी मुद्द्यांवर बैठकीत चर्चा झाली.’  

 

 

अजेंड्यातील 'सकारात्मक' मुद्दे 
- मैला वाहून नेणारी मुलगी उबेर चालवत आहे, चार वर्षांत हा बदल कसा काय घडला? 
- दिव्यांगांच्या दोन शिबिरांना गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये कसे काय सामील करण्यात आले? 
- चार वर्षांमध्ये बॉलीवूडमध्ये खंडणी मागितल्याची कुठली घटना घडल्याचे ऐकले आहे का? 
- पठाणकोट वगळता इतर कुठे स्फोटक हल्ला झाला आहे का? 
- मागील चार वर्षांत भ्रष्टाचाराची कुठलीही मोठी घटना घडली नाही, आता तुम्हीच ठरवा? 
- अनुसूचित जाती, अशिक्षित महिलांपर्यंत उज्ज्वला योजना कुणी पोहोचवली? 
- ११५ मागास जिल्ह्यांची निवड करून त्यांना विकासाच्या मुख्य प्रवाहात कुणी आणले? 

बातम्या आणखी आहेत...