आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

देशातील सर्वात मोठे दानशूर उद्या होणार निवृत्त : २१ व्या वर्षी वनस्पती तेलाची कंपनी कशी सांभाळली, नंतर सॉफ्टवेअर कंपनी कशी स्थापली हे प्रेमजी सांगताहेत

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

देशातील दुसऱ्या क्रमांकाचे श्रीमंत ७४ वर्षीय अझीम प्रेमजी सर्वात प्रतिष्ठित भारतीय दानशूर आहेत. विप्रोचे चेअरमन व मॅनेजिंग डायरेक्टर प्रेमजी आपल्या एकूण दीड लाख कोटी संपत्तीपैकी निम्मी केवळ समाजसेवेसाठी दान करू इच्छितात. यातील ६५ हजार कोटी त्यांनी दानही केले. ते दरवर्षी ५०० कोटी दान करतात. विशेष म्हणजे प्रेमजी इकॉनॉमी क्लासमधून विमान प्रवास करतात आणि मारुती-१००० वापरतात. ३० जुलैला प्रेमजी निवृत्त होत आहेत. ३१ जुलैला त्यांचा मुलगा रिशद कंपनीची जबाबदारी घेईल. प्रेमजी सांगतात...

 

> व्यापार आणि उद्योगाचे बाळकडू वडिलांकडून मिळाले, समाजसेवेची भावना कशी जागृत झाली ?
हा गुण मला आईकडून मिळाला. ती डॉक्टर होती, परंतु तिने कधीही याला व्यवसाय समजला नाही. विवाहानंतर तिने हाजी अलीमध्ये मुलांसाठी अस्थिरोग उपचार केंद्र उघडले. वयाच्या २७ व्या वर्षापासून ७७ वर्षांपर्यंत तिने आपले जीवन गरीब मुलांच्या उपचारांसाठी समर्पित केले होते. तेव्हा आमच्याकडे फार पैसाही नव्हता. पैशाची तजवीज करताना आईला खूप कष्ट पडत. सरकारी मदत मागणे, निधी घोषित झाल्यावर तो मिळण्यासाठी कसरत करण्यातच वेळ जात असे. सरकारने निधी जाहीर केला तरी मिळण्यास विलंब होई.  घरात चार मुले असताना आई रोज ९ तास काम करत असे. आज काळ बदलला. लोकांना वाटते, आपला पैसा पत्नी व मुला-मुलींनाच मिळाला पाहिजे. 
 

 

> वॉरेन बफे व बिल गेट्स यांनी सुरू केलेल्या ‘गिव्हिंग प्लेज’मध्ये तुम्ही तिसरे भारतीय आहात. यात भारतीयांचे प्रमाण कमी का ?
भारतीय मानसिकतेमध्ये कुटुंब अधिक महत्त्वाचे असते. आम्ही दरवर्षी दान करू इच्छिणाऱ्यांना आमंत्रित करतो. यासाठी एक सचिवालय आहे. हा खर्च मीच करतो. आम्ही कुणावरही दबाव आणत नाही. आम्हाला चांगले यश मिळाले असले तरी अजून बराच प्रवास करायचा आहे. 

 

> आपण याबाबत कसे वेगळे आहात?
श्रीमंतीचा मला गर्व वाटत नाही. ज्याच्याकडे ही समृद्धी आहे त्याने गरीब लोकांसाठी काहीतरी केले पाहिजे, असे मला वाटते.


> आपल्याला बदल दिसला?
नवे उद्योजक नवे विचार घेऊन पुढे येतात. मी अनुभवले आहे की, ३५-४० वर्षीय आंत्रप्रेन्यूअर जनकल्याणाचा विचार करतात. भावी काळात हेच लोक समाजसेवेसाठी मोठ्या निधीचा स्रोत ठरतील. 

> सीएसआरनुसार २ टक्के दान द्यावे लागते, ही मदत योग्य आहे?
बहुतांश लोक कंपनीचा सीएसआर निधी आपल्याच फाऊंडेशनसाठी खर्च करतात. यावर बंदी आणली पाहिजे. विप्रोमध्ये ४०० कोटी रुपयांच्या सीएसआरपैकी एकही पैसा आम्ही आमच्या फाऊंडेशनसाठी वापरत नाही.


> विप्रोमध्ये आपली वैयक्तिक भागिदारी एवढी मोठी का? 
वडिलांच्या निधनानंतर ही भागिदारी ५० टक्के होती. डेव्हिडंट म्हणून मिळालेला सर्व पैसा मी विप्रोचे शेअर खरेदी करण्यासाठी वापरला. लोकांनी मला मुर्ख ठरवले. परंतु, विप्रोवर माझा विश्वास नाही तर मग कुणाचा असू शकतो? अशा प्रकारे माझी भागिदारी ७८ टक्यांवर पोहाेचली.


> आपण प्रारंभी वनस्पती तेलाचा व्यवसाय करत होतात. अचानक आयटी क्षेत्रात कसे आलात?
७०च्या दशकात तत्कालीन उद्योग मंत्री जॉर्ज फर्नांडिस यांनी देशात नवे तंत्रज्ञान यावे म्हणून प्रयत्न केले. मात्र, ते (आयबीएम) भारतावर ७-८ वर्षांपूर्वीच कालबाह्य झालेले तंत्रज्ञान लादत होते. फर्नांडिस यांनी नवे तंत्रज्ञान आणावे, असे सांगितले. आयबीएमने यावर नकार दिला तेव्हा फर्नांडिस यांनी शेअर होल्डिंग कमी केली. आयबीएम भारतातून निघून गेली. तेव्हा आयबीएमकडे ८० टक्के मार्केट शेअर होता. ही कंपनी गेल्यानंतर निर्माण झालेली पोकळी भरून काढण्यासाठी आम्ही या क्षेत्रात उतरलो. नंतर मागे वळून पाहण्याची गरज पडलीच नाही.


> तुम्ही आयटीत निपुण नव्हता?
आम्ही थेट कॅम्पसमधून लोक निवडले. इस्रो आणि संरक्षण संशोधनसारख्या संस्थांमधूनही माणसे घेतली. विशेष म्हणजे ज्याला आयटी क्षेत्राबद्दल फार माहिती नाही अशाला आम्ही लीडर नेमले. इतर कंपन्या टेक्निशियनच्या मदतीने चालत होत्या. अशा काळात आम्ही तंत्रज्ञानाचा मोठा उद्योग उभा करत होतो.
 

> तुमच्याकडे इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगची स्टॅनफोर्ड विद्यापीठाची पदवी आहे, पण तुमचे शिक्षण वडिलांच्या निधनामुळे बाधित झाले होते.
मी २१ वर्षांचा होतो, तेव्हा स्टॅनफोर्ड विद्यापीठातून ऑगस्ट १९६६ मध्ये विप्रो सांभाळण्यासाठी परत बोलावण्यात आले होते. मी एक समर स्कूल पूर्ण केली होती, पण ८ किंवा ९ युनिट्स बाकी होते, ते मी २० वर्षांनी बाहेरून पूर्ण केले.


> तेव्हा आयटीवर कुठला कोर्स होता का?
इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग तेव्हा आयटीच्या जवळचे होते. माहिती तंत्रज्ञानासाठी वेगळा कोर्स नव्हता. मला आठवते एकदा एफ. सी. कोहलींनी मला सांगितले की, जेआरडी टाटांनी त्यांना टीसीएसचा पहिला प्रमुख बनवण्याचे ठरवले. तेव्हा कोहलींनी जेआरडींना म्हटले होते, पण मला तर कॉम्प्युटरबाबत काहीच माहीत नाही. जेआरडींचे उत्तर होते की, कॉम्प्युटरबाबत कोणालाही काही माहिती नाही. तुमच्याकडे तर इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगची पदवी आहे.


> तुमच्या वडिलांनी काही गोष्टी सुरू केल्या होत्या. अमेरिकेहून परतल्यानंतर तुम्ही त्या गोष्टी वाढवण्याकडे लक्ष दिले का? 
आम्ही प्राथमिकपणे कमोडिटीज आणि वनस्पती क्षेत्रात होतो, ते आम्ही होलसेल मार्केटमध्ये विकत होतो. आम्ही काम पुढे नेताना एक ब्रँड म्हणून रिटेल करणे सुरू केले आणि एक वितरण जाळे तयार केले. त्यानंतर आम्ही साबणाच्या व्यापारात उतरलो. या काळात आम्ही महत्त्वाचे काम केले ते म्हणजे मॅन्युफॅक्चरिंग प्लँटच्या मशिनरीत गुंतवणूक केली होती. सुरुवातीला खूप अडचणी आल्या. आमचे पहिले प्रॉडक्ट फेल गेले. पण आमच्या गुंतवणुकीमुळे आम्ही संतूर पुन्हा लाँच केले. ते खूप यशस्वी राहिले. त्यानंतर आम्ही टॉयलेटरीजच्या (बाथरूममध्ये उपयोगी ठरणाऱ्या वस्तू) क्षेत्रात पुढे गेलो. 


> या सगळ्यांत स्टॅनफोर्डची मदत कशी झाली?
इंजिनिअरिंग खरे तर मूल्यांकनात मदत करते. विद्यापीठात कोर्स सिलेक्शनमध्ये खूप सूट होती. मी लिबरल आर्ट्समध्ये खूप विषय निवडले. हे सगळे भारतात शक्य नव्हते. कारण येथे इंजिनिअरिंगशिवाय इतर काही शिकण्याची सूट नव्हती. स्टॅनफोर्डच्या शिक्षणाने प्रगती झाली. तेथे मी खूप टेनिस खेळलो आणि एक ईटिंग क्लब जॉइन केला. ईटिंग क्लबमध्ये तुम्ही कॅफेटेरियात खात नाही, सर्व जण एकत्रित खाता आणि क्लबच्या कार्यक्रमांत आनंद घेता. 


> तुमच्या मते विप्रोचे भविष्य कुठे आहे?
मुख्यत्वे आयटीत. भौगोलिक स्तरावर आम्ही खूप वेगाने डायव्हर्सिफाय करत आहोत. आता आम्ही लॅटिन अमेरिका आणि आफ्रिकेतही प्रवेश केला आहे. युरोपात मोठी ताकद लावली आहे. आंतरराष्ट्रीय बाजाराच्या तुलनेत भारतात आयटी सेक्टर वेगाने वाढेल आणि सन्मानजनक स्थितीत पोहोचेल हे आपण पाहू शकतो.

 

> तुम्हाला तुमची अर्धी कमाई दान करायचीय का?

आजच्या स्थितीत सुमारे ४०% तर आधीपासूनच अझीम प्रेमजी फाउंडेशची मिळकत आहे. ही मोठी रक्कम आहे. १० अब्ज डॉलर म्हणजे ६५ ते ७० हजार कोटी होतात. ही टाटा ग्रुपनंतरचे दुसरे सर्वात मोठे दान आहे. दुसरीकडे आमचे वार्षिक अनुदान टाटांच्या बरोबर आहे.

बातम्या आणखी आहेत...