आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Every Vote Given To BJP Is Against Power, Education And Health Deputy Chief Minister Manish Sisodia

भाजपला दिलेले प्रत्येक मत वीज, शिक्षण आणि आरोग्याच्या विरोधात- उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • 'आम्ही दिल्लीकरांची सेवा करण्यासाठी आलो आहोत'

नवी दिल्ली- भाजपला दिलेले प्रत्येक मत वीज, शिक्षण आणि आरोग्याच्या विरोधात असेल, असे मत दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांनी व्यक्त केले. पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी ते म्हणाले की, ‘आप’ सरकारने अनेक योजना आणत नागरिकांना त्याचा लाभ पुरवला. त्या लोक-धोरणांच्या लाभार्थ्यांना ‘फ्रीलोडर्स’ म्हणत भाजपने दिल्लीतील जनतेचा अपमान केला आहे आहे, असेही सिसोदिया यावेळी म्हणाले. पुढे बोलताना सिसोदिया म्हणाले की, दिल्लीकरांना फ्रीलोडर म्हणल्यामुळे, भाजपने त्यांची माफी मागायला हवी. जनतेची सेवा करणे हे प्रत्येक सरकारचे कर्तव्य आहे. आम्ही दिल्लीतील नागरिकांची सेवा करण्यासाठी आलो आहोत. भाजप मोफत वीज, मोफत पाणी, महिलांचा मोफत प्रवास याविरुद्ध आहेत. हा भाजपचा अजेंडा असू शकतो परंतु धोरणांचे लाभार्थी असलेल्या दिल्लीतील जनतेचा ते अपमान करू शकत नाहीत, असेही सिसोदिया यावेळी म्हणाले.  

बातम्या आणखी आहेत...