आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
एंटरटेन्मेंट डेस्क : 'बिग बॉस-१३'च्या फिनालेला केवळ दोन आठवडे बाकी आहेत. यातील सर्व स्पर्धक एका कॉन्फरन्सवेळी स्वत:वरील आरोपांचे खंडन करताना दिसले. विचारलेल्या प्रश्नांवर महिरा शर्मा, सिद्धार्थ शुक्ला, आसिम रियास यांनी ही उत्तरे दिली...
या टप्प्यावर हा गेम वैयक्तिक झाला आहे. तू पारसपेक्षा अधिक सक्षम आहेस असे तुला वाटते का?
माहिरा शर्मा : सध्या जितके लोक या घरात आहेत, ते सर्वच सक्षम आहेत. कारण आम्ही २४ जण होतो. काहीजण वाइल्ड कार्डद्वारे आले आणि पुन्हा परत गेले. आता जितके लोक आहोत त्या सर्वांनी फिनाले जिंकले आहे. आम्ही सर्व सक्षम आहोत. आम्ही टीम वर्कने खेळतो. मी त्यांच्या विरोधात जाऊन एकटी खेळू शकत नाही. जिथे टास्क चालत नाही तिथे एकटीने वेळ घालवावा लागतो तेव्हा मित्रांसोबत बसतो. अशा वेळी वैयक्तिक राहता येत नाही. तथापि, पारस छाबडापेक्षा मी प्रत्येक गोष्टीत सक्षम आहे. हे त्यालाही माहीत आहे. मीच चषक जिंकणार आहे.
तू ज्याप्रकारे गेम खेळला आहे, त्यानुसार बाहेर गेल्यास याचा परिणाम होईल का?
सिद्धार्थ शुक्ला : खरे म्हणजे मी याबाबत कोणताच विचार करत नाही. कारण बिग बॉसच्या घराबाहेरील माहिती मिळत नाही. मी याबाबत अनेकदा संभ्रमात राहिलो, तणावदेखील आला. आमचा फॅमिली राउंड आला होता तेव्हा मी माझ्या आईची विचारपूस केली होती. एवढेच नाही तर आमचा जो फॅमिली व्हॉट्सअॅप ग्रुप आहे, त्यात ती आहे की लेफ्ट झाली, हेदेखील आईला मी विचारले होते. बाहेर काय होत आहे, हे मला काहीच माहीत नाही. इथे जे योग्य वाटत आहे, तेच मी करत आहे. ते कसे चांगले करता येईल, यावरच माझा भर आहे.
एकमेकांना करत असलेल्या सहकार्याबाबत स्पर्धक म्हणाले
सिद्धार्थ : शहनाज माझी चांगली मैत्रीण आहे. तथापि, ती सहकार्य करत नाही तेव्हा त्याचा माझ्यावर परिणाम होतो. मी नेहमी आपले बेस्ट देण्याचा प्रयत्न करतो. मी जिंकलो नाही तेव्हा नक्कीच वाईट वाटेल.
माहिरा शर्मा : 'बिग बॉस'च्या घरात राहताना संधीसाधू प्रश्नांमुळे तीन वेळा रडले आहे. सिद्धार्थने मला अनेक वेळा दुखावले. जी व्यक्ती मला फसवी वाटते, ती माझा मित्र होऊच शकत नाही. पारसने मला पहिल्या दिवसापासून सहकार्य केले आहे. त्याच्यामुळेच इतका काळ घरात राहू शकले.
पारस छाबडा : मी एक तार छेडली होती तेव्हा आसिम वेडा झाला. एक प्रियकर आपल्या प्रेयसीवर खर्च करतो आणि एक प्रेयसी आपल्या प्रियकरावर खर्च करत असेल तर त्यात वाईट काय? मी स्वत:ला या शोचा विजेता म्हणून पाहतो. बाकी शहनाजला आधीच मैत्रीण बनवयाचे नव्हते.
हिमांशीला प्रपोज करत होतास तेव्हा बाहेर तुझी एक प्रेयसी आहे, याची जाणीव एकदाही कशी झाली नाही?
आसिम रियाज : बाहेर माझी कोणतीच प्रेयसी नाही. त्यामुळे प्रपोज करण्यापूर्वी विचार केला नाही. माझे एका मुलीसोबत रिलेशन होते, परंतु आता ती फक्त माझी मैत्रिण आहे. आय लव्ह हिमांशी. माझी बाहेर कोणतीच प्रेयसी नाही.
रश्मी देसाई : आरती माझी बेस्ट फ्रेंड आहे.आरतीकडून इमोशनल सपोर्ट मिळतो. या घरात मला कामचुकार म्हटले जाते, पण मला जिथे योग्य वाटते तिथेच बोलते. या आणि माझ्या बाजूने बोला, असे मी कुणालाच म्हणाले नाही. या घरात मिळणाऱ्या टास्कचा मी आदर करते.
शहनाज कौर : मी या घरात नकारात्मक प्रतिमा घेऊन आले होते. मला सिद्धार्थचे धेरण आवडते. त्याच्यावर खूप प्रेम करते. मी ज्याच्यासोबत जोडली जाते तेव्हा जरा जास्त जोडली जाते. यामुळे अनेकदा मी मूर्खदेखील बनते. मला ट्रॉफी व सिद्धार्थ देघोही हवे आहेत.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.