आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'प्रत्येक व्यक्तीला बोलण्याचे आणि लिहिण्याचे स्वातंत्र्य आहे', जय भगवान गोयल यांचे स्पष्टीकरण

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • 'आज के शिवाजी, नरेंद्र मोदी' पुस्तकामुळे राज्यात राजकारण चांगलेच तापले आहे

नवी दिल्ली-  भाजप नेते जय भगवान गोयल यांनी लिहिलेल्या "आज के शिवाजी नरेंद्र मोदी" या पुस्तकावरुन राज्यात राजकारण चांगलेच तापले आहे. भाजपवर सर्वत्र टीका होत आहे. यातच आता या पुस्तकाचे लेखक म्हणजेच जय भगवान गोयल यांनी आपली प्रतिक्रीया दिली आहे. "शिवाजी महाराजांचा मीही सन्मान करतो. महाराजांच्या वंशजांनीही आणि इतर लोकांनी हे पुस्तक वाचावे, त्यांना त्यांच्या प्रश्नांची उत्तरे मिळतील," असे मत गोयल यांनी व्यक्त केले. 

एका वृत्त वाहिनीला प्रतिक्रीया देताना गोयल म्हणाले की, "प्रत्येक व्यक्तीला बोलण्याचे आणि लिहिण्याचे स्वातंत्र्य आहे. त्यामुळे मला जे वाटले ते मी लिहिले. शिवाजी महाराजांच्या वंशाजांनी ते पुस्तक वाचावे. मी त्यात काहीही वादग्रस्त लिहिले नाही. मीही शिवाजी महाराजांचा सन्मान करतो. जे लोक याचा विरोध करत आहेत त्यांनी पुस्तक वाचावे, त्यांना त्यांचे उत्तर मिळेल. छत्रपती शिवाजी महाराज हे छत्रपती शिवाजी महाराजचे आहेत. त्यांचा पूर्ण सन्मान आहे आणि तो कायम राहील. त्यांची बरोबरी कोणीच करू शकत नाही. मी लहानपणापासून छत्रपती शिवाजी महाराजांचा चाहता आहे. त्यामुळे लहानपणापासून माझ्या अंगात हिंदूत्वाची भावना माझ्यात आहेत", असेही जय भगवान गोयल यावेळी म्हणाले.