आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रत्येकाने गुप्त ठेवाव्यात स्वतःच्या या गोष्टी, चुकूनही कोणाला सांगू नयेत

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

शुक्राचार्य महान ज्ञानी व्यक्ती असण्यासोबतच एक कुशल नीतीकार होते. शुक्राचार्यांच्या अनेक नीती आजही खूप महत्त्वपूर्ण ठरतात. शुक्रनीतीमध्ये शुक्राचार्यांनी अशा 9 गोष्टींबद्दल सांगितले आहे, ज्या नेहमी गुप्त ठेवणेच आवश्यक आहे. मनुष्याच्या स्वतःशी संबंधित या 9 गोष्टी इतरांना समजणे नुकसानकारक ठरू शकते. जाणून घ्या कोणकोणत्या आहेत या 9 गोष्टी.

आयुर्वित्तं गृहच्छिद्रं मंत्रमैथुनभेषजम्।

दानमानापमानं च नवैतानि सुगोपयेतू।।

श्लोकाचा संपूर्ण अर्थ

कामक्रिया 

कामक्रीडा पती-पत्नीमधील सर्वात गुप्त गोष्टींमधील एक आहे. पती-पत्नीच्या वयक्तिक गोष्टी एखाद्या तिसऱ्या व्यक्तीला समजल्यास अडचणी आणि अपमानाला सामोरे जावे लागते. यामुळे याविषयी गुप्तता पाळावी.

दान

जे लोक इतरांची प्रशंसा मिळवण्यासाठी किंवा लोकांमध्ये स्वतःचा मोठेपणा दाखवण्यासाठी केलेल्या दानाचा दिखावा करतात त्यांना दानाचे फळ कधीच प्राप्त होत नाही. यामुळे याविषयी गुप्तता पाळावी.

आयु

आयु म्हणजे वय जेवढे गुप्त ठेवले जाईल तेवढेच चांगले मानले जाते. तुमचे वय इतरांना समजल्यास तुमचे विरोधक या गोष्टीचा योग्यवेळी तुमच्या विरुद्ध उपयोग करू शकतात. यामुळे याविषयी गुप्तता पाळावी.

मान

स्वतःच्या मान-सन्मानाचा दिखावा कल्यास लोकांच्या नजरेत तुमची प्रतिमा खराब होऊ शकते. यासोबतच अशा सवयीमुळे तुमच्या जवळचे लोकही तुमच्यापासून दूर जाऊ शकतात. 

मंत्र

देवाची कृपा प्राप्त करण्यासाठी तुम्ही ज्या मंत्राचा जप करता, तो कोणालाही सांगू नये. जो व्यक्ती स्वतःचा पूजा-पाठ आणि मंत्र गुप्त ठेवतो त्यालाच त्याचे फळ मिळते.

धन

तुमच्याकडे असलेल्या धनाची माहिती कमी लोकांना असणेच चांगले मानले जाते. अन्यथा काही लोक तुमचे धन मिळवण्यासाठी तुमच्याशी जवळीक साधून नंतर तुम्हाला धोका देऊ शकतात.

अपमान

मनुष्याने स्वतःचा झालेला अपमान गुप्तच ठेवावा. ही गोष्ट इतरांना समजल्यास तेसुद्धा तुम्हाला मान देणे सोडून देतील आणि तुमच्यावर हसतील.

औषध

तुमच्या फॅमिली डॉक्टरला तुमच्या अनेक वयक्तिक गोष्टी माहिती असतात. शत्रू किंवा तुमच्यावर जळणारे लोक डॉक्टरच्या मदतीने तुमच्यासाठी अडचण निर्माण करू शकतात.

ग्रहदोष

ग्रहांसंबंधित दोषाचे वर्णन इतरांसमोर करणे अडचणीचे ठरू शकते. ग्रह शांतीसाठी करण्यात आलेल्या उपायांची माहिती इतरांना दिल्यास त्याचे फळ मिळत नाही.