आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Everything Is Normal Even In Minus 44 Degrees; School Holidays Only If Temperature Drops Below 52 Degrees, Heat Garage Set Up For Cars

उणे 44 अंशामध्येही सर्वकाही सामान्य; पारा उणे 52 अंशाच्या खाली गेला तरच शाळांना दिली जाते सुटी, कार चालाव्यात म्हणून हीट गॅरेजची उभारणी

2 वर्षांपूर्वीलेखक: वृत्तसंस्था
  • कॉपी लिंक
  • रशियातील याकुटिया; जगातील सर्वात थंड क्षेत्र, हिवाळ्यात सूर्याचे फक्त तीन तासच दर्शन
  • पारा उणे ५८ अंशापर्यंत उतरतो, हा भाग सोने, हिरे, कोळशाने समृद्ध

​​​​​याकुटियाहून (रशिया) : पूर्वोत्तर रशियातील साखा जिल्हा (याकुटिया) ही जगातील सर्वात थंड मानवी वस्ती आहे. येथे ओम्यकॉन हे गाव आहे. सैबेरियातील सम भाषेत ओम्यकॉनचा अर्थ होतो 'न गोठलेले पाणी' आणि या भागात तर वर्षातील बहुतांश काळ नद्या गोठलेल्या असतात. आर्क्टिक सर्कलपासून फक्त ३५० किमीवर हा भाग आहे. हिवाळ्यात सूर्यदर्शन होते फक्त तीन तास आणि उन्हाळ्यात चक्क २१ तास सूर्य दिसतो. एवढी कडाक्याची थंडी असूनही येथे सामान्य जीवन थांबत नाही. कितीही थंडी असो, मुले रोज शाळेत जातात. यंदाही शाळांना सुटी मिळेल, परंतु तापमान उणे ५२ अंशाखाली गेल्यावरच. सध्या पारा उणे ४४ अंशावर आहे म्हणून सर्व काही सामान्य आहे.

मातीही गोठलेली, कबर खोदायला कित्येक दिवस लागतात

ओम्यकॉन हे मॉस्कोपासून ३,३०० मैल पूर्वेला आहे. येथे हिवाळ्यात पारा उणे ५८ अंशांपर्यंत उतरतो. तरीही हे एक आकर्षक पर्यटनस्थळ आहे. यंदाही इथे अनेक लोक हरणांच्या शिकारीसाठी आले आहेत. शिल्पकारही तेवढेच उत्साही. बर्फच बर्फ असल्याने ते येथे शिल्प तयार करत मन रमवतात. मॉस्कोहून इथे पोहोचण्यासाठी दोन दिवस लागले. मृतांचे दफन ही सर्वात मोठी समस्या. माती गोठून कडक झाल्याने कबर खोदण्यास कित्येक दिवस लागतात. जमिनीवर शेकोट्या पेटवून माती ढिली करावी लागते. थोडे खोदकाम करायचे आणि पुन्हा शेकोटी पेटवायची, असे करून कबर खोदली जाते.

बुटापासून अगदी कपड्यांपर्यंत सर्वच हरणाच्या कातड्याचे

याकुटियामध्ये कारमधील इंधन गोठणे नेहमीचेच. गिअरही अचानक जाम होऊन बसतात. त्यामुळे जागोजाग हीट गॅरेज उभारण्यात आले आहेत. कार कुठे बाहेर सोडायची म्हटले तर चालूच ठेवावी लागते. पेनातील शाई पण गोठते. लोकांना थोडी ऊब मिळते ती जनावरांच्या कातडीपासून तयार केलेल्या कपड्यांतून. चपलाही फरपासून तयार केलेल्या असतात. यात हरणाची कातडीच वापरली जाते. या भागात सर्वच गावांत दुकाने, शाळा, स्पोर्ट सेंटर व कॅफे आहेत. याकुटिया भाग गॅस, सोने, हिरे आणि कोळशाने समृद्ध आहे. म्हणूनच येथे राहणारे लोकही समृद्ध आहेत.

याकुटियाची लोकसंख्या ३ लाख असून शाळा, पोस्ट, बँकेसह येथे रनवेही आहेत. प्रत्येक गावात रुग्णालय आणि डॉक्टर आहेत. हा भाग जगापासून तुटलेला असला तरी येथे गरजेच्या सर्व वस्तू उपलब्ध आहेत.