आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

सिंचन घोटाळ्यातील पुरावे कधीच रद्दीत विकले, फडणवीसांवर एकनाथ खडसेंचे टीकास्त्र  

एका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • 'आम्ही लढलो असतो तर पाच-पंचवीस जागा वाढल्या असता'

मुंबई- भाजपशिवसेनेची अनेक वर्षांपासून असलेली युती निवडणुकीनंतर मुख्यमंत्री पदामुळे तुटली. त्यानंतर राज्यात मोठे सत्तानाट्य सुरू झाले. कट्टर विरोधक असलेल्या शिवसेना-काँग्रेस-राष्ट्रवादीने ऐतिहासिक आघाडी केली आणि सत्ता स्थापनेचा दावा केला. त्यामुळे 'आमच्याकडे स्पष्ट बहुमत नाही. त्यामुळे आम्ही सत्तास्थापनेचा दावा करणार नाही,' असे म्हणत भाजपने सत्तेपासून दूर होण्याची भूमिका घेतली. पण नंतर 23 नोव्हेंबरला सकाळी अनपेक्षितरित्या देवेंद्र फडणवीस यांनी अजित पवारांच्या मदतीने मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. याबद्दल बोलताना एकनाथ खडसे फडणवीसांवर टीका केली आहे. 'अजित पवारांविरोधातील पुरावे आम्ही केव्हाच रद्दीत विकले, तेव्हा रद्दीचा भावही चांगला होता', असे
खडसे म्हणाले.
पुढे बोलताना खडसे म्हणाले की, ''माझ्यासहित विनोद तावडे, चंद्रशेखर बावनकुळे, प्रकाश मेहता या नेत्यांना तिकीट न देत फक्त सोबत घेतले असते तरीही पक्षाच्या पाच पंचवीस जागा वाढल्या असत्या. मात्र आम्हाला डावलण्यात आले. कठीण कालखंडात आम्ही पक्ष उभा केला. मात्र अशा नेत्यांना बाजूला ठेवण्यात आलं,'' असं म्हणत एकनाथ खडसे यांनी अप्रत्यक्षपणे देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला आहे.