आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ईव्हीएम हॅक करणे शक्य नाही; पृथ्वीराज चव्हाणांचा दावा

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई  - भारतात वापरले जाणारे ईव्हीएम सॅटेलाइटद्वारे किंवा  प्रत्यक्ष तारेने जोडल्याशिवाय हॅक करता येणे शक्य नाही. कारण त्यात रिमोट ऑर्डर स्वीकारण्यासाठी रिसिव्हर नसते, असे संगणकतज्ज्ञ असलेले काँग्रेस नेते  पृथ्वीराज चव्हाण  यांचे म्हणणे आहे. मात्र, विद्यमान राज्यकर्त्यांनी त्यात काही डिव्हाइस बसवून घेतले असेल तर सांगता येत नाही, अशी टिप्पणीही ते करतात. “दिव्य मराठी’शी अनौपचारिकपणे बोलताना त्यांनी हे मत व्यक्त केले.

 

भारताच्या निवडणूक आयोगाच्या धर्तीवर आंतरराष्ट्रीय पातळीवरदेखील निवडणूक आयोग असावा, असे मत आपण नुकतेच जागतिक माजी राष्ट्रप्रमुख आणि राज्यप्रमुखांच्या परिषदेत मांडले आहे, असेही त्यांनी सांगितले. या परिषदेला उपस्थित राहून  पृथ्वीराज चव्हाण हे मंगळवारी भारतात परतले. भारतातून पृथ्वीराज चव्हाण हे एकमेव या परिषदेचे सदस्य आहेत. नायजेरिया, नार्वे, न्यूझीलंड, माल्टा, गिनिया, बोलिविया, युक्रेन आणि आयर्लंडचे माजी प्रमुख या परिषदेला उपस्थित होते. मुंबईत आल्यानंतर बुधवारी त्यांनी दिव्य मराठीशी विशेष संवाद साधला आणि ईव्हीएम, एक्झिट पोल आणि राज्यातील काँग्रेसच्या स्थितीवर त्यांनी सविस्तर गप्पा मारल्या.ईव्हीएम हे काही वायफाय किंवा वायरने जोडलेले नसते. सिग्नल रिसिव्ह करण्यासाठी त्यात कुठलीही यंत्रणा नसते. त्यामुळे वायफाय वा अन्य कोणत्या माध्यमातून ते मशीन हॅक करणे शक्य नाही. आपला निवडणूक आयोग खूपच चांगला आणि पारदर्शी काम करणारा आहे. इतक्या मोठ्या देशात अशा प्रकारे निवडणूक यंत्रणा राबवणे आणि एका दिवसात निकाल जाहीर करणे सोपे नाही. जगाला याचे अप्रूप आहे. या पदावरची एखादी व्यक्ती चुकीचे वागत असेल म्हणून व्यवस्थेचे महत्त्व कमी होत नाही, असेही ते म्हणाले. कोलंबियामध्ये झालेल्या परिषदेबाबत भारताच्या निवडणूक आयोग आणि निवडणूक प्रक्रियेबद्दल चर्चा झाली. लोकांना आपल्या निवडणुकीबाबत खूप उत्सुकता आहे. 


 

भाजपच्या १०० जागा कमी होतील
अनेक देशांत निवडणुका होतात, परंतु त्या पारदर्शक पद्धतीने होतात का हे पाहण्यासाठी आंतरराष्ट्रीय निवडणूक आयोग असावा आणि ज्या देशात निवडणुका आहेत तेथे या निवडणूक आयोगाच्या सदस्याला निरीक्षक म्हणून पाठवण्यात यावे, अशी सूचना मी या परिषदेत केली, असेही त्यांनी सांगितले. एक्झिट पोलवर माझा विश्वास नसून भाजपच्या गेल्या वेळेपेक्षा १०० जागा कमी होतील आणि देशात त्रिशंकू अवस्था निर्माण होईल, असे सांगून पृथ्वीराज चव्हाण यांनी राज्यातही काँग्रेसची स्थिती चांगली असून केंद्रात जर सत्ताबदल झाला तर राज्यात आघाडीचे सरकार पुन्हा येईल, असा आशावादही त्यांनी व्यक्त केला.

बातम्या आणखी आहेत...