Home | National | Delhi | EVM machine has been hacked said by opposition

ईव्हीएमचा थेट न्यायालयात, विरोधकांनी उचलून धरला मुद्दा, सुप्रीम कोर्टात होणार सुनावणी

दिव्य मराठी वेब टीम | Update - Apr 14, 2019, 07:52 PM IST

भाजपवाले स्वतःला मर्द म्हणतात आणि चोरीही करतात- अरविंद केजरीवाल

 • EVM machine has been hacked said by opposition

  नवी दिल्ली- लोकसभा निवडणुकींच्या काळात ईव्हीएम मशीनचा मुद्दा पुन्हा समोर आला आहे. पहिल्या टप्प्यातील मतदानानंतर काँग्रेससोबतच अनेक विरोधी पक्षांनी ईव्हीएम मशिनसोबत लावण्यात आलेल्या व्हीव्हीपॅट मशीनच्या रिअॅक्शन टाइम आणि त्यामधून निघणाऱ्या पावतीवर आक्षेप घेतला आहे, त्यासोबत परत एकदा ईव्हीएममध्ये घोटाळा झाल्याचा आरोप केला आहे. हा मुद्दा घेऊन सर्व पक्ष आता सुप्रीम कोर्टात जाणार असल्याचे समोर आले आहे.


  ''सेव्ह डेमोक्रेसी'' या नावाने रविवारी विरोधी पक्षांनी एक पत्रकार परिषद घेतली. यामध्ये मनु सिंघवी, कपिल सिब्बल, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्रबाबू नायडू यांची उपस्थिती होती. यावेळी काँग्रेस नेते आणि वकील अभिषेक मनु सिंघवी म्हणाले- ''ईव्हीएममध्ये मत देण्यासाठी बटन दाबल्यानंतर त्याच्यासोबत लावण्यात आलेल्या व्हीव्हीपॅट मशीनमधून निघत असलेली पावती फक्त 3 सेकंदांसाठी दिसते. हा काळ खूप कमी आहे, हा वेळ वाढवून 7 सेकंद करावा.''


  त्यासोबतच, मतदारांनी ज्या उमेदवाराला मत दिले आहे, त्याच्याऐवजी व्हीव्हीपॅट मशीनमधून निघालेल्या पावतीमध्ये दूसऱ्याच उमेदवाराचे नाव आहे. अशा काही तक्रारी समोर आल्याचे अभिषेक मनु सिंघवी यांनी सांगितले. म्हणजेच ईव्हीएममध्ये छेडछाड करण्यात आली आहे.


  दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी ईव्हीएममध्ये छेडछाड झाल्याचा आरोप लावला आहे. केजरीवाल म्हणाले, "मशीन खराब नाहीत, त्याच्यामध्ये घोटाळा करण्यात आला आहे. कोणत्याही पक्षाला मत दिल्यानंतर ते भाजपलाच जावे अशी या मशीनची डिझाइन करण्यात आली आहे. ज्या मशीन खराब असल्याच्या तक्रारी येतात त्यामध्ये चुकून मत भाजपलाच का जाते? दुसऱ्या पक्षाला का जात नाही? हा एक विचार करण्यासारखा मुद्दा आहे. मी एक इंजीनियर आहे. मला या गोष्टी कळतात. काही तरी गडबड नक्कीच आहे. भाजपवाले स्वतःला मर्द म्हणतात आणि चोरीही करतात असा आरोप त्यांनी लावला आहे."


  त्यासोबतच मतदान यादीतून मतदारांचे नाव गायब झाल्याचा आरोप टीडीपी चीफ आणि आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी लावला आहे. तेलंगानामध्ये तंत्रज्ञानाचा चुकीच्या पध्दतीने वापर करून 25 लाख मतदारांचे नाव लिस्टमधून काढून टाकण्यात आले असल्याचेही ते यावेळी म्हणाले.

Trending