आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

इवोलेटने सादर केली 100 kg वजन उचलणारी कमर्शियल ई-बाइक, शोले चित्रपटातील घोडीच्या नावावरुन ठेवले नाव 'धन्नो'

7 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • 'शोले' चित्रपटातून घेतले 'धन्नो' नाव, सिंगल चार्जमध्ये 80 किमी चालेल

ऑटो डेस्क- ग्रेटर नोएडामध्ये सुरू असलेल्या ऑटो एक्सपो 2020 मध्ये अनेक इलेक्ट्रिक वेहिकल सादर करण्यात आले आहेत. यात कार, बस, बाइक अशा विविध पर्यायात इलेक्ट्रीक वाहने उपलब्ध आहेत. या सर्व कंपनीत एक नाव हरियाणातील बिलासपूरची कंपनी इवोलेटचे आहे. इवोलेटने 'धन्नो' नावाने कमर्शियल ई-बाइक सादर केली आहे. या बाइकने एक्सपोमध्ये सर्वांचेच लक्ष आकर्षित केले आहे.


इवोलेटच्या एमडी आणि सीईओ प्रेरणा चतुर्वेदी यांनी सांगितले की, आम्ही दर वर्षी 1 लाख ई-स्कूटर विकण्याचा प्रयत्न करत आहोत. याशिवाय आम्ही पॅसेंजर आणि कार्गो ट्रांसपोर्टेशनमध्ये ई थ्री व्हीलर्सच्या माध्यमातून कमर्शियल वेहीकल सेगमेंटमध्ये येत आहोत. या योजनेतून आम्ही पुढील वर्षीपर्यंत 1 हजार कोटींच्या टर्नओव्हरची आशा करत आहोत.

'शोले' चित्रपटातून घेतले 'धन्नो' नाव

लोकप्रिय चित्रपट 'शोले'मध्ये हेमामालिनी यांनी साकारलेल्या बंसती तांगेवालीच्या घोडीचे नाव धन्नो होते. धन्नो अनेक प्रवासी आणि वजन उचलून पळू शकत होती. यामुळेच आम्ही त्या घोडीच्या नावावरुन गाडीचे नाव धन्नो ठेवले. या बाईकची खासियतच आहे की, तुम्ही या गाडीवर खूप सारे वजन पेलू शकतात.

सामानासाठी मिळेल स्पेशल ट्रे

धन्नोच्या बॅक सीटला कंपनीने याप्रकारे डिझाइन केले आहे की, याला ओपन केल्यावर एक मोठा ट्रे बनतो. या ट्रेवर खूपसारे सामान ठेवू शकतात. तसेच, फ्रंटवर मोठा लेग रुम दिला आहे. गाडीच्या समोर एक मोठे बास्केट आहे, यातही तुम्ही सामान ठेवू शकता. एकूण धन्नो जवळपास 100 किलो सामान उचलू शकते.

सिंगल चार्जमध्ये 80 किमी चालेल

धन्नोमध्ये 72 वोल्टची बॅटरी दिली आहे, जी 3 ते 4 तासात फूल चार्ज होते. सिंगल चार्जमध्ये गाडी 80 किलोमीटर चालू शकते. धन्नोची टॉप स्पीड 45 किमी प्रती तास आहे. याचा लूक एखाद्या क्रूजर बाइकसारखा आहे.

पहिल्यांदाच ई- बाइक 3 सस्पेंशन

या ई-बाइकला पूर्णपणे कमर्शियल वापरासाठी बनवले आहे. यामुळेच या बाईकच्या बॅक साइडला 3 सस्पेंशन आहेत. ही पहिलीच वेळ असेल, जेव्हा एखाद्या बाईकमध्ये तीन सस्पेशंन असतील. याशिवाय, यात मागे आणि पुढे एलइडी लाइट आहेत. 

0