आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राष्ट्रवादीचे इनकमिंग सुरू, नाशिक जिल्ह्यातील भाजपचे माजी आमदार माणिकराव कोकाटे यांचा जाहीर प्रवेश

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये जोरदार इनकमिंग सुरू झाले असून, नाशिक जिल्हयातील भाजपचे माजी आमदार माणिकराव कोकाटे यांनी आज आपल्या समर्थकांसह राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. हा प्रवेश सोहळा राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेश कार्यालयात पार पडला. यावेळी प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील यांनी त्यांचे पक्षात स्वागत केले. 




भाजपच्या मेगाभरतीनंतर आता राष्ट्रवादीमध्येही इनकमिंक सुरू झाले आहे. नाशिक जिल्ह्यातील भाजपने माजी आमदार माणिकराव कोकाटे यांनी आपल्या कार्यकर्त्यांसह राष्ट्रवादीमध्ये जाहीर प्रवेश केला. त्यांच्या या पक्षप्रवेशावेळी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, अजित पवार इत्यादी नेत्यांची उपस्थिती होती. कोकाटे यांच्या प्रवेशानंतर राष्ट्रवादीकडून त्यांना सिन्नर विधानसभा मतदारसंघांची उमेदवारी घोषित झाली आहे. प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी याची अधिकृत माहिती दिली. 




या दरम्यान, कोकाटे यांच्याव्यतिरीक्त पैठणचे भाजप युवा मोर्चा उपाध्यक्ष दत्तात्रय कोरडे, भानुदास पिसे, अप्पासाहेब गायकवाड यांनीही राष्ट्रवादीत जाहीर प्रवेश केला.  यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील, ज्येष्ठ नेते आमदार छगन भुजबळ, पक्षाचे विधीमंडळ पक्षनेते अजितदादा पवार, आमदार किरण पावसकर, नाशिक शहराध्यक्ष रंजन ठाकरे उपस्थित होते.