Politics / काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्ष पदावर मराठी चेहरा? सुशील कुमार शिंदेंच्या नावावर गांधी कुटुंबियांचा शिक्कामोर्तब

अध्यक्ष पदावर लवकरच अधिकृत घोषणा होण्याची शक्यता

दिव्य मराठी वेब

Jun 30,2019 03:25:51 PM IST

मुंबई / नवी दिल्ली - काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींची जागा सुशील कुमार शिंदे घेणार असल्याची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. काही माध्यमांनी तर माजी मुख्यमंत्री सुशील कुमार शिंदे यांच्या नावाची केवळ औपचारिक घोषणा बाकी असल्याचे म्हटले आहे. लोकसभा निवडणुकीत पराभूत झाल्यानंतर राहुल गांधींनी आपल्या अध्यक्ष पदाचा राजीनामा देणार असल्याचे पक्षांतर्गत बैठकांमध्ये सांगितले. सोबतच, पुढील अध्यक्ष गांधी घराण्याबाहेरील असावा त्यांचा आग्रह होता. यानंतर चर्चेत आलेल्या नावांपैकी महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री शिंदे यांच्या नावावर एकमत झाल्याचे समोर आले आहे.


काँग्रेस अध्यक्षपदासाठी यापूर्वी ही नावे होती चर्चेत
सुत्रांच्या माहितीनुसार, काँग्रेसने एकमताने सुशील कुमार यांना अध्यक्ष पद देण्याचा निर्णय घेतला आहे. परंतु, अधिकृत घोषणेसाठी आणखी काही वेळ लागू शकतो. तत्पूर्वी राहुल गांधींचे उत्तराधिकारी होण्यासाठी मल्लिकार्जुन खरगे, गुलाम नबी आझाद, अशोक गलहोत, जनार्दन द्विवेदी आणि मुकुल वासनिक यांच्यासह माजी संरक्षण मंत्री ए.के. अॅण्टोनी यांच्या नावांचा प्रस्ताव होता. विशेष म्हणजे, लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रातील दलित नेते सुशील कुमार शिंदे यांचा देखील पराभव झाला. मीडिया रिपोर्टनुसार, अंतर्गत चर्चेत शिंदेंच्या नावावर शिक्कामोर्तब झाल्यानंतर आता ते लवकरच राहुल गांधींची भेट घेणार आहेत.

X
COMMENT