आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रजासत्ताक दिनी पंढरपूरमध्ये खूनाच्या घटनेमुळे खळबळ, माजी ग्रामपंचायत सदस्यावर झाडल्या गोळ्या

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • जमिनीच्या वादातून हत्या झाल्याची माहिती

पंढरपूर- आज प्रजासत्ताक दिनी पंढरपूर तालुक्यात खूनाची घटना घडली आहे. तालुक्यातील भाळवणी येथील माजी ग्रामपंचायत सदस्य विश्वास भागवत उर्फ बापू यांची अज्ञान हल्लेखोरांनी गोळ्या झाडून हत्या करण्यात केली आहे. पंढरपूर-सातारा रोडवर आज दुपारी एकच्या दरम्यान झालेल्या या हत्येमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.
सातारा रोडवर असलेल्या न्यू इंग्लिश स्कूलसमोर विश्वास भागवत आपल्या मित्रांसोबत गप्पा मारत होते. यावेळी दोन अज्ञात हल्लेखोर मोटरसायकलवर आले आणि कोणालाही काही कळायच्या आत विश्वास भागवत यांच्यावर गोळ्या झाडल्या. या घटनेंतर विश्वास यांना तात्काळ हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले पण उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. दरम्यान, जमिनीच्या वादातून विश्वास यांचा खून झाल्याची माहिती आहे. 
 

बातम्या आणखी आहेत...