आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शेतकऱ्यांसाठी माजी आमदाराचा पुढाकार, चंद्रकांत रघुवंशी यांनी मुख्यमंत्री सहायता निधीसाठी 15 लाखांचा धनादेश दिला

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • 'सामाजिक बांधीलकीतून ही रक्कम देण्यात आली आहे'

नंदुरबार- राज्याचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना मुख्यमंत्री सहायता निधीसाठी माजी आमदार चंद्रकांत रघूवंशी यांनी 15 लाखांचा धनादेश मुंबई येथे सुपुर्द केला. गोरगरीब जनतेला मदत व्हावी, तसेच संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना आर्थिक मदत देता यावी, यासाठी नंदुरबार तालुका विधायक समिती तसेच रघूवंशी कुटुंबियांच्यावतीने 15 लाखांची मदत करण्यात आली. यावेळी सिल्लोडचे आमदार अब्दूल सत्तार, पाचोऱ्याचे आमदार किशाेर पाटील, शिवसेनेचे जिल्हा प्रमुख विक्रांत मोरे,उपजिल्हाप्रमुख देवेेंद्र जैन उपस्थित होते.




सध्या शेतकऱ्यांची अवस्था दयनिय आहे. सामाजिक बांधीलकीतून ही रक्कम देण्यात आली आहे. अशी प्रतिक्रीया रघूवंशी यांनी व्यक्त केली. तसेच उध्दव ठाकरे यांनीही निधी मिळाल्यानंतर समाधान व्यक्त केले. राज्यात मुख्यमंत्रीपदाची सुत्रे हाती घेतल्यानंतर नंदुरबारमधून सहाय्यता निधी दिल्याने इतरांनीही यातून प्रेरणा मिळेल,असा सुर उमटत आहे.

बातम्या आणखी आहेत...