आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

केजच्या माजी आ. संगीता ठोंबरेंच्या अडचणीत वाढ;‘तो’ निकाल अंबाजोगाई न्यायालयाकडून कायम

एका वर्षापूर्वीलेखक: प्रतिनिधी
  • कॉपी लिंक
  • संगीता ठोंबरे या लोकनेते गोपीनाथराव मुंडे मागासवर्गीय सहकारी सूतगिरणीच्या मुख्य प्रवर्तक आहेत

बीड- बनावट स्वाक्षऱ्या करून लोकनेते गोपीनाथराव मुंडे मागासवर्गीय सहकारी सूतगिरणीच्या संचालक पदावर नेमणूक केल्याच्या संचालक गणपती कांबळेंच्या तक्रारीवरून केजच्या माजी आमदार संगीता ठोंबरे व त्यांचे पती डॉ. विजय ठोंबरे यांच्याविरोधात फसवणुकीसह इतर गुन्हे नोंद व चौकशी करून अहवाल सादर करण्याचे आदेश केजच्या न्यायालयाने दिले होते. या प्रकरणात आता अंबाजोगाई येथील जिल्हा व सत्र न्यायाधीश एस. एस. सापतनेकर यांनी केज न्यायालयाचा आदेश कायम ठेवला आहे.


लहुरी येथील लोकनेते गोपीनाथराव मुंडे मागासवर्गीय सहकारी सूतगिरणीच्या माजी आमदार संगीता ठोंबरे या मुख्य प्रवर्तक आहेत. तर, पती डॉ. विजयप्रकाश ठोंबरे हे या सूतगिरणीचे चेअरमन आहेत.  संचालक गणपती सोनाप्पा कांबळे यांच्या बनावट स्वाक्षरी करून संचालक पदावर नियुक्ती केल्याची त्यांची तक्रार आहे. सदर गैरव्यवहारात संगीता  ठोंबरे व पती विजयप्रकाश ठोंबरे यांनी आपल्या खोट्या स्वाक्षऱ्या करून शासनाची व जनतेची फसवणूक करत आपणास नाहक गोवण्याचा प्रयत्न केला.  या आर्थिक व्यवहारात आपला काही संबंध नसून पुराव्यादाखल त्यांनी आपल्या खोट्या सह्या केल्याचा फॉरेन्सिक तज्ज्ञ आश्विनी पवार यांचा अहवाल आणि शपथपत्र जोडून तक्रार दिली होती.


यावरून केजच्या प्रथमवर्ग न्यायालयाने ऐन निवडणुकीच्या तोंडावर संगीता ठोंबरे व विजयप्रकाश ठोंबरे यांच्याविरुद्ध फसवणुकीसह इतर कलमान्वये गुन्हा नोंद करून चौकशी करावी आणि अहवाल सादर करण्याचे आदेश दिले होते.दरम्यान, या आदेशाविरोधात ठोंबरेंनी अंबाजोगाई येथील जिल्हा सत्र न्यायालयात स्थगिती मागितली होती. मात्र अंबाजोगाई येथील जिल्हा व सत्र न्यायाधीश  एस. एस. सापतनेकर यांनी केज न्यायालयाचा आदेश कायम ठेवला.

बातम्या आणखी आहेत...