आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

माजी आ. संताेष टारफे आणि आ. संताेष बांगर यांचे मनोमिलन; संतोष भेटीमुळे राजकीय वर्तुळात संतोष!

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

हिंगोली - कळमनुरी विधानसभा मतदारसंघाच्‍या निवडणुकीत एकमेकांविरुद्ध आरोप प्रत्‍यारोप करणारे दोन संतोष म्हणजेच माजी आ. संताेष टारफे आणि आमदार संताेष बांगर यांची शनिवारी ( ता.१६) भेट झाली. त्यांच्या या भेटीने राजकीय वर्तुळातून संतोष व्यक्त केला जात आहे.

कळमनुरी विधानसभा मतदारसंघात काँग्रेसकडून माजी आमदार संतोष टारफे व शिवसेनेकडून आमदार संतोष बांगर निवडणूक रिंगणात होते. निवडणूक प्रचाराच्‍या काळात स्‍थानिक पातळीवरील विकासाचे मुद्दे तसेच आरोप प्रत्‍यारोप चांगलेच रंगले होते. यामधे शिवसेनेचे संतोष बांगर विजयी झाले. कळमनुरी मतदारसंघात विजयी झालेले शिवसेनेचे संतोष बांगर यांनी शनिवारी माजी आमदार डॉ. संतोष टारफे यांच्‍या निवासस्‍थानी जाऊन भेट घेतली. या वेळी माजी आमदार डॉ . टारफे यांनी आमदार  बांगर यांचा सत्कार केला. तसेच एकमेकांना पेढाही भरवला. यावेळी त्‍यांनी मतदारसंघातील विकासकामांबाबत चर्चा केली. दोन संतोषांच्‍या भेटीने राजकीय वर्तुळातून आश्चर्य व्यक्त होत आहे. मात्र निवडणुकीतील आरोप प्रत्यारोप विसरून दोघांनी संवाद साधल्याने मतदार संघाच्या विकासासाठी प्रयत्न होणार असल्याचे चित्र आहे.विकासाला प्राधान्य देणार 

कळमनुरी विधानसभा मतदारसंघाच्‍या विकासाचे आश्वासन निवडणुकीच्‍या वेळी दिले होते. त्‍यानुसार मतदारसंघात विकासकामांसाठी राजकीय मतभेद विसरून आपण माजी आमदार डॉ. टारफे यांची भेट घेतली. आता फक्‍त विकासालाच प्राधान्य देणार आहे. 
संतोष बांगर, आमदारबातम्या आणखी आहेत...