आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या मुलीला वाटते मोदींची भिती

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जोधपूर (राजस्थान)- माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांची मुलगी आणि लेखिका दमन सिंग शनिवारी आपल्या पुस्तकाशी संबंधीत आयोजित केलेल्या एका कार्यक्रमासाठी जोधपूरला आल्या होत्या. या दरम्यान त्यांनी पत्रकारांशी राजकारण आणि आपल्या वडीलांविषयी चर्चा केली. चर्चेदरम्यान त्यांना मोदीबद्दल प्रश्न विचारला असता, त्या म्हणाल्या मी प्रयत्न करते की, त्यांना बघूच नये. याचे कारण मला माहिती नाही आणि सांगणे कठीण आहे, पण मला एक वेगळीच अनुभूती येते त्यामुळे मी मोदींना बघत नाही.


आपले मत मांडण्याचे मोदींना पूर्ण स्वातंत्र्य 
सध्याचे नेते एवढी अर्वाच्च भाषा वापरतात की, मी ते ऐकण्याचे टाळते. त्या म्हणाल्या की मला खूप दुःख होते जेव्हा लोक अशी भाषा बोलतात यामुळे तरूणांवर आणि लहान मुलांवर याचा परिणाम होतो. यानंतर जेव्हा त्यांना विचारले पंतप्रधान त्यांच्या वडीलांना नाइट वाचमॅन म्हणतात. त्यावर दमन म्हणाल्या मी याविषयी काही बोलू शकत नाही. आणि पंतप्रधानांना जे वाटते ते बोलू शकतात, त्यांना याचे पूर्ण स्वातंत्र्य आहे.


योग्य वेळेवर बोलतात मनमोहन
लेखिकेला जेव्हा विचारले की, आपल्या वडीलांची मीडियाने 'शांत' आणि 'मौन' अशी एक प्रतिमा तयार केली आहे. ते वैयक्तिक आयुष्यात असेच आहेत का, त्यावर दमन म्हणाल्या की, माध्यमांचे कर्तव्य आहे की जे घडत आहे त्यावरच टिका करावी. माझ्या वडीलांचा स्वभाव खूप शांत आहे, ते गरजेपेक्षा जास्त कोणाशीच बोलत नाहीत. बोलण्यासाठी ते योग्य वेळेची वाट पाहतात. असे नाही की, त्यांना बोलता येत नाही किंवा काही अडचण आहे. पण त्यांची अशी धारणा आहे की, जर काही महत्वाची गोष्ट असेल तर नक्कीच ते बोलतील.

 

पंतप्रधान असताना त्यांनी 50 मुलाखती दिल्या.
दमन सिंह यांनी सांगितले की, माझे वडील जेव्हा पंतप्रधान होते तेव्हा त्यांनी 10 वर्षांत वन-टू-वन सुमारे 50 मुलाखती दिल्या. याव्यतिरिक्त माझ्याकडे त्यांच्या प्रेस काँफ्रेंसचे कलेक्शन आहे. त्यांनी जवळपास 90 प्रेस कॉन्फ्रेंस केल्या आहेत. यातील 10 प्रेस कॉन्फ्रंस अशा होत्या ज्यामध्ये 100 पेक्षा जास्त पत्रकार होते. आणि त्यावेळीसुद्धा ते कोणत्याही प्रश्नांना घाबरले नव्हते, जर त्यांना एखादा प्रश्नाचे उत्तर देता आले नाही तर ते माहिती घेऊन प्रश्नाचे उत्तर द्यायचे.