Home | Maharashtra | Western Maharashtra | Solapur | Ex-sainik Kshirsagar gives 25 thousand help to flood victims

माजी सैनिक क्षीरसागर यांची पूरग्रस्तांना २५ हजारांची मदत

प्रतिनिधी | Update - Aug 24, 2018, 12:42 PM IST

बाळे येथील शिवाजीनगर परिसरातील रहिवासी माजी सैनिक पांडुरंग क्षीरसागर यांनी केरळमधील पूरग्रस्तांना २५ हजार रुपयांची मदत

  • Ex-sainik Kshirsagar gives 25 thousand help to flood victims

    सोलापूर- बाळे येथील शिवाजीनगर परिसरातील रहिवासी माजी सैनिक पांडुरंग क्षीरसागर यांनी केरळमधील पूरग्रस्तांना २५ हजार रुपयांची मदत दिली आहे. २५ हजार रुपयांचा धनादेश निवासी उपजिल्हाधिकारी संजय तेली यांच्याकडे जमा केला आहे. अडचणीत असलेल्या भावाला आपण मदत केली असतीच ना. आज केरळमधील अनेक बांधव पुरामुळे अडचणीत आहेत. त्यांना मदतीसाठी खारीचा वाटा उचलावा म्हणून आज पंचवीस हजार रुपयांची मदत जिल्हा प्रशासनाकडे सुपुर्द करीत असल्याची भावना क्षीरसागर यांनी बोलून दाखविली.


    सैन्यदलातून निवृत्त झालेले पांडुरंग कडाप्पा क्षीरसागर यांनी सैन्यदलाच्या इलेक्ट्रिकल अॅण्ड मेकॅनिकल इंजिनिअअरिंग शाखेत सेवा बजावली आहे. श्री. क्षीरसागर यांना प्रशिक्षणादरम्यान आलेल्या अपंगत्वामुळे सैन्यातून निवृत्त व्हावे लागले. पॅराशूट ट्रेनिंगच्या वेळी अपघात झाल्यामुळे त्यांना अपंगत्व आले. त्यांना एकच मुलगी असून त्या जिल्हा न्यायालयात लिपीक म्हणून काम करतात. श्री. क्षीरसागर म्हणाले, सैन्यात असताना माझ्याबरोबर अनेक सहकारी केरळमधील होते. पुराच्या बातम्या बघून, वाचून त्यापैकी काही जणांची आठवण आली. वारंवार काहीतरी मदत द्यावी, असे वाटत होते. शेवटी आज जिल्हाधिकारी कार्यालयात येऊन धनादेश दिला आणि मगच मनाला थोडा दिलासा मिळाल्याचे क्षीरसागर म्हणाले. यावेळी सहाय्यक जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी रमेश राजगिरे, माहिती अधिकारी रवींद्र राऊत उपस्थित होते.


    थेट मदतीचे आवाहन...
    केरळमधील पूरग्रस्तांना मदत करण्यासाठी केरळ सरकारनेच बँक खाते क्रमांक उपलब्ध करून दिले आहे, ज्या नागरिकांना, संस्थांना मदत करायची आहे, त्यांनी थेट खात्यावरच रक्कम जमा करावी, असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी संजय तेली यांनी केले आहे. सर्व तहसीलदारांनाही अशाच सूचना देण्यात आल्या आहेत. केरळ मुख्यमंत्री पूरमदत निधी स्टेट बँक ऑफ इंडिया, शाखा त्रिवेंद्रम खाते क्रमांक ६७३१९९४८२३२, आयएफएससी कोड एसबीआयएन ००७००२८ या खात्यावर रक्कम जमा करावी.

Trending