Home | International | Other Country | Ex UN General Secretary Kofi Annan Dead In Switzerland

UN चे माजी महासचिव कोफी अन्नान यांचे निधन, कुटुंबियांनी ट्वीटरवर केली अधिकृत घोषणा

दिव्य मराठी वेब टीम | Update - Aug 18, 2018, 05:14 PM IST

कोफी अन्नान यांच्या निधनाची माहिती त्यांच्या कुटुंबियांनी ऑफिशिअल ट्विटर अकाउंटवर ट्वीट करून दिली आहे.

  • Ex UN General Secretary Kofi Annan Dead In Switzerland
    बर्न (स्वित्झरलंड) - संयुक्त राष्ट्रचे माजी महासचिव कोफी अन्नान यांचे शनिवारी निधन झाले. ते 80 वर्षांचे होते. कोफी अन्नान यांच्या निधनाची माहिती त्यांच्या कुटुंबियांनी ऑफिशिअल ट्विटर अकाउंटवर ट्वीट करून दिली आहे. त्यानुसार, "गेल्या अनेक दिवसांपासून आजारी असलेले कोफी अन्नान यांचे 18 ऑगस्ट रोजी निधन झाले आहे." स्वित्झरलंडच्या रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. अन्नान यांचा जन्म 8 एप्रिल 1938 रोजी घाना येथे झाला होता. अन्नान जानेवारी 1997 मध्ये संयुक्त राष्ट्रचे 17 वे प्रमुख बनले होते. तसेच डिसेंबर 2006 पर्यंत ते या पदावर कार्यरत होते. 2001 मध्ये त्यांना शांततेचे नोबेल पुरस्कार प्रदान करण्यात आले होते.

Trending