आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

CRIME: नवऱ्याने आणली दुसरी बायको; चिडून पहिलीने सवतेवर घडवला सामूहिक बलात्कार

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

चंदीगड - अंबालाच्या कॅन्ट रेल्वे कॉलनीत 19 सप्टेंबर रोजी झालेल्या नवदांपत्याच्या अपहरणात धक्कादायक माहिती शनिवारी समोर आली आहे. वधू आणि वराचे अपहरण करणारी पीडित युवकाची माजी पत्नीच निघाली. तिनेच आपल्या नातेवाइकांच्या मदतीने आपल्या माजी पती आणि त्याच्या नववधूचे गुंड लावून अपहरण केले. लग्नाच्या अवघ्या 4 दिवसानंतर तिने हा कट रचला. यानंतर आपल्या नातेवाइकांकडून माजी पत्नीच्या नववधूवर गँगरेप घडवला. पोलिसांनी पीडित वधूच्या तक्रारीवरून तीन जणांच्या विरोधात अपहरण आणि बलात्काराचा गुन्हा दाखल केला आहे. 


घटस्फोटानंतर केला होता दुसरा विवाह
युवकाने दिलेल्या तक्रारीनुसार, त्याचा विवाह 2013 मध्ये गुरुग्राम येथे राहणारी रेखा (काल्पनिक नाव) हिच्याशी झाला होता. लग्नानंतर दोघांमध्ये वाद सुरू झाले. यानंतर काही दिवसांतच ती घर सोडून माहेरी गेली. वारंवार प्रयत्न करूनही तिने परतण्यास नकार दिला. स्वतः गेल्यानंतर ती तयार झाली नाही. यानंतर पतीने 2017 मध्ये एकतर्फी घटस्फोटाचा अर्ज दिला. डिसेंबरमध्ये त्यास मंजुरी सुद्धा मिळाली. यानंतरच त्याने काही दिवसांपूर्वी एका तरुणीसोबत दुसरा विवाह केला. परंतु, लग्नाच्या अवघ्या 4 दिवसांनंतर त्यांच्या घरावर माजी पत्नी गुंड घेऊन पोहोचली.


अचानक घरात गुंड घेऊन पोहोचली माजी पत्नी...
14 सप्टेंबर रोजी युवकाने पानीपतच्या एका तरुणीसोबत दुसरा विवाह केला. लग्नाला फक्त 4 दिवस झाले होते, की 19 सप्टेंबर रोजी रात्री अचानक त्यांच्या दारावर आदळण्याचे आवाज सुरू झाले. दार उघडले तेव्हा माजी पत्नी रेखा आपल्या नातेवाइक आणि 10 ते 15 गुंडांसह घरात घुसली. युवकाला आणि त्याच्या पत्नीला बेदम मारहाण सुरू केली. डायलेसिसवर असलेल्या आईच्या हाताला लागलेल्या मशीन सुद्धा काढून फेकल्या आणि तिला देखील मारहाण केली. तिने युवकाला त्याच्या नवविवाहितेसह फरपटत कारमध्ये नेले. 


टोल दिसताच कानावर लावायचे बंदूक
यानंतर कारमध्ये डांबून दोघांना पानीपतच्या दिशेने घेऊन गेले. टोल नाका किंवा ट्रॅफिक दिसताच ते लोक या दोघांच्या डोक्यावर बंदूक लावत होते. कोऱ्या कागदांवर स्वाक्षरीचा प्रयत्न केला. यानंतर माजी पत्नीच्या दोन नातेवाइकांनी आळी-पाळीने नववधूवर बलात्कार केला. पोलिसांनी पाठलाग केला तेव्हा त्यांना वाटेतच सोडून दिले. यानंतर युवक आपल्या पत्नीला घेऊन टॅक्सीने पानीपतला पोहोचला आणि त्यांनी पोलिसांत तक्रार दाखल केली.

 

बातम्या आणखी आहेत...