आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राष्ट्रीय मुक्त विद्यालयाचे वेळापत्रक जाहीर; 3 ते 1 नोव्हेंबर दरम्यान होणार परीक्षा

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद -  नॅशनल इंस्टिट्यूट ऑफ ओपन स्कूलिंगने (राष्ट्रीय मुक्त विद्यालय) दहावी, बारावीच्या परिक्षेचे वेळापत्रक जाहीर केले आहे. यावर्षी ही परीक्षा तीन ऑक्‍टोबर ते एक नोव्हेंबर यादरम्यान घेण्यात येईल; तर परेदशातून भारतात परिक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी तीन ते 31 ऑक्‍टोबर  2019 दरम्यान परीक्षा होतील. परीक्षा झाल्यानंतर दीड महिन्यात निकाल जाहीर करण्यात येतो. यासाठी nios.ac.in या अधिकृत संकेतस्थळावर विद्यार्थी अर्ज करता येणार आहे.

नॅशनल इंस्टिट्यूट ऑफ ओपन स्कूलिंग म्हणजे काय आहे ?
मानव संसाधन विकास मंत्रालयाकडून १९८९  साली "राष्ट्रीय मुक्त विद्यालय' सुरु करण्यात आले होते. देशातील कोणत्याही विद्यार्थ्याला कमी खर्चात, कोठूनही, शाळा, महाविद्यालयात न जाता शिक्षण घेता यावे आणि परिक्षा देता याव्यात हा या मागचा उद्देश होता. ही जगातील सर्वात मोठी ओपन स्कूलिंग देणारी संस्था आहे. परीक्षेच्या वेळापत्रक पाहाण्यासाठी nios.ac.in या वेबसाइटवर जावे, त्यानंतर कोणत्या इयत्तेची परीक्षा द्यायची ती इयत्ता टाकावी, त्यानंतर डेट शिट या लिंकवर जावे, ज्या इयत्तेची परीक्षा द्यायची ते वेळापत्रक दिसेल. त्याची प्रिंट आऊट डाऊनलोड करुन घ्यावी.

बातम्या आणखी आहेत...