आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कॉपी करण्यासाठी घरातच काढले परीक्षा केंद्र, ११ जणांना अटक

एका वर्षापूर्वीलेखक: वृत्तसंस्था
  • कॉपी लिंक
  • यूपीच्या देवरियातील घटना, कारकून फरार
  • यूपी बोर्डात १० वी, १२वीचे ५६ लाख विद्यार्थी

देवरिया - उत्तर प्रदेशातील देवरिया जिल्ह्यात एका खासगी शाळेत बोर्डाच्या परीक्षेत कॉपी करण्याचे मोठे प्रकरण हाती लागले आहे. भटनी येथील कर्मयोगी श्रीपती बाबू उच्च माध्यमिक विद्यालयात परीक्षा केंद्र असताना एका चपराशाच्या शाळेत, दहावीच्या विज्ञानाची प्रश्नपत्रिका घेण्यात आली. तेथे छापा टाकल्यानंतर , उत्तर पत्रिका कोणी दुसराच सोडवत असल्याचे दिसले. घटनास्थळी अनेक अर्धवट उत्तर पत्रिका, गाईड व स्टँप (रबरी शिक्के) आढळली. जिल्हा प्रशासनाने शाळेला काळ्या यादीत टाकले आहे. या प्रकरणी केंद्र व्यवस्थापक, उपप्राचार्यासह १० जण अटकेत आहेत. आरोपी चपराशी फरार आहे. हे रॅकेट प्राचार्य व चपराशाचे षडयंत्र होते, असे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले.  
या प्रकरणाची पोलिसांनी चौकशी सुरू केली असून बड्या राजकीय व्यक्तींचा यास आशीर्वाद असावा, अशी शक्यता पोलिस पडताळून पाहात आहेत. यूपी बोर्डात १० वी, १२वीचे ५६ लाख विद्यार्थी

यूपी बोर्डाच्या १० वी व १२ वीच्या परीक्षेत सुमारे ५६ लाख विद्यार्थी परीक्षा देत आहेत. उपमुख्यमंत्री व शिक्षणमंत्री दिनेश वर्मा यांनी सांगितले, राज्यात कॉपी प्रकरणात २९ शाळांची मान्यता रद्द करण्यात येत आहे. १२५ लोकांविरोधात तक्रार देण्यात आली आहे. 

बातम्या आणखी आहेत...